आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Interview, When He Demanded Glass Of Water After Asked Question On Riots

...जेव्हा नरेंद्र मोदींना विचारला प्रश्न त्यांनी लगेच मागितले पाणी, मुलाखतीत होतात संतप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि्ल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर काँग्रेसचे काही नेते आणि माध्यमांमधील एका मोठ्या गटाने आता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनीदेखील राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार परिषदेला सामोरे जावे किंवा एखाद्या वृत्तावहिनीला मुलाखत द्यावी, अशी मागणी सुरु केली आहे. मोदी सध्या देशभर निवडणूक प्रचार सभा घेत आहेत. मात्र माध्यमांना सामोरे जाण्याचे ते सतत टाळतात.
पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरही मुलाखत टाळली
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना पक्षाचे पंतप्रधानपदाचे अधिकृत उमेदवार जाहीर केले. तेव्हापासून त्यांनी कोणत्याही वृत्तवाहिनीला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिलेली नाही. गेल्या वर्षी 12 जुलै रोजी त्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला आणि त्याच महिन्यात उर्दू दैनिकाचे संपादक शाहिद सिद्दीकी यांना एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली होती. या मुलाखतीमधील मोदींच्या वक्तव्याने वादंग निर्माण झाले होते.
वृत्तवाहिनींच्या मुलाखतीत मोदी होतात संतप्त ?
इलेक्ट्रॉनिक मीडियासोबतच्या तीन मुलाखती दरम्यान नरेंद्र मोदींना 2002 च्या दंगलींबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांची बॉडीलँग्वेज बदललेली दिसली. जेवढ्या सहजतेने ते इतर प्रश्नांची उत्तरे देतात तेवढी सहजता दंगलीबद्दलच्या प्रश्नांवर दिसून आलेली नाही. कदाचित त्यामुळेच मोदी इलेक्ट्रॉनिक माध्यमांना मुलाखती देण्याचे टाळत असावेत.

पत्रकार करण थापर यांनी 2007 मध्ये मोदींची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीदरम्यान थापर यांनी 2002 च्या दंगलींसंबंधीचा प्रश्न विचारल्यानंतर मोदींनी पाणी मागितले होते. पाणी प्यायल्यानंतर मुलाखत अर्धवट सोडली आणि ते निघून गेले होते.
2009 मध्ये एका पत्रकाराने प्रचार सभेवरुन मोदी परतत असताना त्यांच्या गाडीमध्ये त्यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा त्या पत्रकाराने दंगलीसंबंधी प्रश्न विचारल्यानंतर मोदींनी मुलाखत पुढे सुरु ठेवण्यास नकार दिला आणि पत्रकाराला मध्येच उतरवून दिले होते.
2012 मध्ये गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीबद्दल मोदींना छेडले असता त्यांनी टीव्ही कॅमेराकडे पाहणे बंद केले होते. त्यानंतर राजदीप यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना दंगलीबद्दल बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर मोदींनी त्यांच्याकडे पाहणे सोईस्कर टाळल्याचे दिसून आले.

पुढील स्लाइडमध्ये, करण थापर यांच्या मुलाखतीदरम्यान का मागितले मोदींनी पाणी