आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Invites Sonia Gandhi Manmohan Singh Over Tea

मोदी यांनी सोनिया आणि मनमोहन सिंग यांच्याशी जीएसटी विधेयकावर केली चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कॉंग्रेस अध्‍यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान निवास 7 रेसकोर्स येथे यावेळी 35 मिनिटे चर्चा चालली. या वेळी अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडूही उपस्थित होते. मोदी यांची दोन्ही नेत्यांशी वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) आणि संसदेच्या कामकाजाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोदींना केला होता फोन :
संसदेचे हिवाळी अधिवेशनाचचे दुस-या दिवसाचे कामकाज सुरु होण्‍यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस अध्‍यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोन केला होता. दोन्ही नेत्यांना शुक्रवारी संध्‍याकाळी संसदेचे कामकाज संपल्यानंतर चर्चेसाठी आमंत्रण दिले होते.