आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या व्यावसायिकांमुळेच अर्थव्यवस्थेला आधार : मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुकानदार, भाजीविक्रेते, विणकर, गवंडी, वृत्तपत्र विक्रेत्यांसारख्या छोट्या व्यावसायिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मोठमोठ्या कंपन्या नव्हे तर छोट्या व्यावसायिकांचे किरकोळ व्यवसाय हेच भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देतात, असे त्यांनी म्हटले.

देशातील छोट्या व्यावसायिकांना मोदींनी ३१ मार्च रोजी लिहिलेले पत्र गुरुवारी जारी झाले. त्यात मोदी यांनी "मुद्रा' योजनेतील फायदे विशद करत सांगितले, जर तुमचे हात मजबूत झाले तर तुम्ही या देशाला नव्या उंचीवर न्याल. खूप लोकांना वाटते की, देशात मोठमोठ्या कंपन्यांचा दबदबा आहे. मात्र, प्रत्यक्षात तुमच्या सारखे ५.५ कोटी छोटछोटे व्यवसाय हेच लघु विनिर्मिती, व्यापार आणि सेवा व्यवसायाच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देतात.
मोदींनी अशा ११- १२ कोटी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी बहुतांशी अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय अल्पसंख्याकांचा समावेश असलेल्या लघु उद्योगांची प्रशंसा केली.