आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गतिमान एक्स्प्रेस: पहिली सेमी हायस्पीड रेल्वे 9 जूनला धावणार !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे गतिमान एक्स्प्रेस दिल्ली - आग्रा मार्गावर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होणार आहे. या रेल्वेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करण्याची शक्यता आहे. या रेल्वेचा वेग ताशी 160 किलोमीटर असेल. दोनवेळा रेल्वेची चाचणी झाली आहे. सध्या रेल्वेच्या सुरक्षितेबाबतची प्रमाणपत्रे मिळणे बाकी आहे.
नऊ जून रोजी धावणार रेल्वे
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (सीआरएस) परवानगी मिळणे बाकी आहे. मात्र नऊ जून रोजी रेल्वे धावेल अशी यंत्रणेची तयारी सुरु आहे. रेल्वेच्या उदघाटनासाठी पंतप्रधानांची तारीख मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उदघाटनाला वेळ होत असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर अधिकारी म्हणाले, की सुरक्षेच्या मानकासंबंधी विभागाने काही चिंता व्यक्त केल्या होत्या, त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्ली - आग्रा मार्गावर बहुतेक ठिकाणी संरक्षक उपाय योजले गेले आहेत. त्याशिवाय सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गात सिग्नल अपग्रेड केले जात आहेत. या मार्गावर सेमी हायस्पीड रेल्वे यशस्वी झाल्यानंतर इतर नऊ मार्गांवर ही सेवा चालवण्याची रेल्वेची योजना आहे. त्यात कानपूर-दिल्ली, चंदीगड-दिल्ली, हैदराबाद-चेन्नई, नागपूर-बिलासपूर, गोवा-मुंबई, नागपूर-सिकंदराबाद यांचा समावेश होणार आहे.

रेल्वेची वैशिष्ट्य
>5400 हॉर्स पॉवरचे इंजन
>12 मॉर्डन कोच असतील
>160 किमी ताशी वेग
>105 मिनीटात 200 किमी अंतर कापणार
>9 इतर मार्गांवर धावणार रेल्वे
>25 टक्के जास्त दर शताब्दी एक्स्प्रेसच्या तिकीट दरांपेक्षा
बातम्या आणखी आहेत...