आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 45 सदस्यांच्या मंत्रिमंडळासह नरेंद्र मोदींनी शानदार समारंभात घेतली शपथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - सगळ्यांच्याच नजरा लागून असलेल्य देशाच्या नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यास राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीनंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 15 व्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशाची राष्ट्रभाषा असलेल्या हिंदी भाषेतून त्यांनी शपथ घेतली. राष्ट्रपतींनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्या पाठोपाठ खालील सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
कॅबिनेट मंत्री
राजनाथ सिंह- गृहमंत्रालय
सुषमा स्वराज- परराष्ट्र मंत्रालय
अरुण जेटली- अर्थ मंत्रालय, संरक्षण मंत्रालय
व्यंकय्या नायडू- शहर विकास मंत्रालय
नितीन गडकरी- वाहतूक आणि शिपिंग मंत्रालय
सदानंद गौडा- रेल्वेमंत्री
उमा भारती-
डॉ. नजमा हेपतुल्ला- अल्पसंख्याक मंत्रालय
गोपीनाथ मुंडे-
रामविलास पासवान- अन्न पूरवठा मंत्रालय
कलराज मिश्र-
मेनका गांधी- महिला व बालकल्याण मंत्रालय
अनंत कुमार-
रवीशंकर प्रसाद- दूरसंचार, कायदा आणि सुव्यवस्था मंत्रालय
अशोक राजू-
अनंत गिते-
हरसिमरत कौर बादल,
नरेंद्रसिंह तोमर-
ज्युअल ओराम-
राधामोहन सिंह- कृषी मंत्रालय
थावरचंद गेहलोत-
स्मृती इरानी- मनुष्यबळ विकास मंत्रालय
डॉ. हर्षवर्धन-
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
व्ही.के.सिंह, इंद्रजित सिंह, संतोष कुमार गंगवाल, श्रीपाद नाईक, धर्मेंद्र प्रधान, सर्वानंद सोनवाल, प्रकाश जावडेकर, पियूष गोयल, डॉ. जितेंद्र सिंह, निर्मला सीतारमण,
राज्यमंत्री
जी.एम.सिद्धेश्वर, मनोज सिन्हा, निहाल चंद, उपेंद्र कुशवाह, पी राधाकृष्णन, किरण रिजीजू, कृष्ण पाल, डॉ. संजीव कुमार बालिया, मनसुखभाई वसवा, रावसाहेब दानवे, विष्णूदेव सहाय, सुदर्शन भगत
या सोहळ्यासाठी सार्क देशांच्या प्रमुखांसह देशभरातील प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहेत. हे सर्व पाहुणे कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले आहेत. सर्व पाहुणे राष्ट्रपती भवनात पोहोचण्यास सुरुवात झाली असून, सुरक्षा आणि इतर व्यवस्था पाहणारे पाहुण्यांच्या व्यवस्थेची जबाबादारी पाहत आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगही नुकते कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले आहेत. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील, सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासह देशातील जवळपास सर्वच प्रमुख नेते या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
ठाकरे, अंबानी पोहोचले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरेही या समारंभासाठी उपस्थित आहे. त्याचबरोबर अनिल अंबानी, टीना अंबानी यांच्यासह मुकेश अंबानीही पत्नी नीता अंबानी आणि अनंत व आकाश या दोन्ही मुलांसह शपथविधीसाठी उपस्थित आहेत. त्यांच्यासह इतही मान्यवर हळूहळू कार्यक्रमस्थळी उपस्थित होत आहेत.
त्याचबरोबर अपेक्षेप्रमाणे साधु संतांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. नरेंद् मोदींचे अभिनेते आणि ग्लॅमर जगताशी अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यामुळेच सोहळ्यामध्ये चित्रपटसृष्टीतील पाहुणेही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा राष्ट्रपती भवनात कोण कोणते मान्यवर आले आहेत.....