आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

125 जणांना \'भीम अॅप\'साठी प्रोत्साहित करा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ठरेल आदरांजली - मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डिजिटल व्यवहारांसाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सरकारने लाँच केलेल भीम अॅप महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हे अॅप देशातील सव्वाशे कोटी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. मोदींनी रविवारी मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, येत्या 14 एप्रिल पर्यंत प्रत्येकाने किमान 125 लोकांना भीम अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल. 
 
वसंताचे आगमन झाल्याचे मोदींनी सांगितले. ते म्हणाले, वातावरण अल्हाददायक असेल तर लोकही त्याचा आनंद घेतात. नुकतेच भारताने 104 उपग्रह अवकाशात सोडले. याचे जगभरातून कौतूक होत आहे. इस्त्रोने ही ऐतिहासिक कामगिरी करुन देशाचे नाव उंचावले आहे. 
 
- शेतकऱ्यांनी कडधान्यांच्या उत्पादनाच्या हाकेला प्रतिसाद दिला. कडधान्याचे विक्रमी उत्पादन झाले. कडधान्यामधूनच देशातील गरीबांना प्रोटिन मिळते. 
- शेतकऱ्यांनी मेहनत घेतली आणि विक्रमी 2700 लाख टन कडधान्याचे उत्पादन केले. 
- स्वच्छता समाचार हा विशेष कार्यक्रम दुरदर्शनने सुरु केला आहे. 
- स्वच्छतेच्या आड येणारे सर अडथळे तोडण्यात आले आहे. 
- आयएएस अधिकाऱ्याने टॉयलेट पीट स्वच्छ केले. यामुळे सर्वसामान्यांमध्येही स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण होते. 
- स्वच्छतेचा माध्यमांनीही अधिक प्रचार केला. 
अनेक मंत्रालय त्याचा अधिक प्रसार करीत आहे. 
- ब्लाइंड टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय खेळाडूंनी यश मिळवले. त्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन. 
- बेटी बचाओ बेटी पढाओ हा आता सरकारी कार्यक्रम राहिला नाही. हा सामाजिक उपक्रम झाला आहे. 
- मुलींबद्दल सकारात्मक विचार होत आहे, हे चांगले संकेत आहेत. 
- मुली कोणत्याही बाबतीत मुलांपेक्षा कमी नाहीत, हे समाज स्वीकारत आहे. 
- सुकन्या समृद्धी योजनेत अनेक पालकांनी गुंतवणूक केली आहे. 
- महिला या देशात सर्व ठिकाणी बरोबरीच्या आहेत. अधिकार, सन्मान आणि संपत्तीतही त्यांना बरोबरीचा अधिकार आहे. 
- मन की बात मधून मला देशात काय सुरु आहे ते कळते. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...