आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना भेटण्यासाठी धक्का-बुक्की, सोनिया गांधी पंतप्रधानांमध्ये नमस्कार-चमत्कारही नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपती भवनात शुक्रवारी रात्री अॅट होम कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहाण्यासाठी आणि ऐकण्यासाठी व्हीआयपी मंडळींमध्ये धक्का-बुक्की झाली. 68 व्या स्वातंत्र्यदिना निमीत्त राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात मोदींना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी गर्दी उसळली होती. काहीवेळ त्यांनी लोकांसोबत चर्चा केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव मोदींना तेथून दूर नेण्यात आले. यावेळी तीन हजार लोक राष्ट्रपती भवनात उपस्थित होते. याच कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी देखील उपस्थित होत्या मात्र, मोदी आणि त्यांच्यात नमस्कार देखील झाला नाही. सोनिया गांधी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत चर्चा करताना दिसल्या.
सुरक्षेचे कडे तोडले
नरेंद्र मोदी यांनी सुरक्षेचे कडे तोडत लोकांशी चर्चा केली. मोदींचा ऑटोग्राफ आणि त्यांच्या हातात हात घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज
राष्ट्रपती भवनात मोदींनी विकासात्मक काम करण्यासाठी देशातील प्रत्येकाने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.

पुढील स्लाइडमध्ये अॅट होम कार्यक्रमातील आणखी छायाचित्र