आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modis Special Suit In Hydrabad House Read More At Divya Marathi

चहा आणि कुर्त्यानंतर आता मोदींचा \'जोधपुरी सुट\' बनला ब्रॅन्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( फोटो - मोदींच्या सुटवर पिवळ्या अक्षरात नरेंद्र दामोदरदास मोदी असे लिहिलेले होते )
नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी फॅशनच्या बाबतीत मिशेल ओबामांना देखील मागे टाकले आहे. एवढेच नव्हे तर मोदींनी काल (रविवार) दिवसभरात एक नाही दोन नाही तर चक्क चार वेळा वेग-वेगळे ड्रेस परिधान केले होते.
सकाळी विमानतळावर ओबामांचे स्वागत करण्यासाठी मोदींनी कुर्ता आणि खांद्यावर शॉल घेतली होती. यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित गार्ड ऑफ ऑनर कार्यक्रमासाठी सुट घातला होता. तर राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या भोजन कार्यक्रमासाठी पांढ-या रंगाचा जोधपुरी सुट परिधान केला होता.
पण, या सगळ्यामध्ये चर्चेत राहिला तो हैदराबाद हाउसमधील जोधपुरी सुट. या सुटचे वैशिष्ट म्हणजे या सुटवर पिवळ्या धाग्याने बारीक अक्षरात 'नरेंद्र दामोदरदास मोदी' असे लिहिले होते. त्यामुळे आता चहा आणि हाफ जॅकेट पाठोपाठ मोदींच्या जोधपूरी सुटाने देखील वेगळी छाप पाडली आहे. हैदराबाद हाउसमधील भेटी दरम्यान घातलेला सुट अहमदाबाद येथील जेड ब्लूने डिझाइन केलेला होता अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

चहा आणि कुर्त्याला बनवले ब्रांड
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान मोदींनी ‘चहा वालादेखील बनू शकतो पीएम’ हा मुद्दा गाजवला होता. तसेच याकाळात भाजपतर्फे त्यांच्या प्रचारासाठी 'चाय पे चर्चचे' आयोजन देखील करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर ओबामा आल्यावर देखील हैदराबाद हाउसमध्ये 'चाय पे चर्चा' आयोजित करण्यात आली होती.
मोदींचा हाफ कुर्ता देखील चर्चेत
मोदी घालत असलेल्या हाफ जॅकेटची देखील सगळीकडे चर्चे होत असते. एका मुलाखतीमध्ये मोदींनी सांगितले होते की, मी ज्यावेळी संघाचा प्रचारक होतो तेव्हा मी हाफ जॅकेट घालायचो आणि दुसरे कारण म्हणजे हाफ जॅकेट धूण्यासाठी कमी कालावधी लागतो.