आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Not Come In Parliament, Opposition Attack On Prime Minister

मोदींची ‘घर वापसी’गरजेची, पंतप्रधान संसदेत येतच नसल्याची ओरड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हिंदू संघटनांकडून ‘घर वापसी ’च्या नावावर करण्यात येणा-या कथित धर्मांतराच्या मुद्द्यावर तिस-या दिवशीही राज्यसभेत गदारोळ झाला. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान संसदेत येत नाहीत. त्यांची ‘घर वापसी’ (संसदेत उपस्थिती) गरजेची आहे, अशी मागणी लावून धरली.

काँग्रेस सदस्य शशी थरूर यांनी जवाहरलाल नेहरू यांचे स्मरण केले. नेहरूंकडेही बहुमत होते. त्यानंतरही ते संसदेत उपस्थित राहत. परंतु विद्यमान पंतप्रधान संसदेत अधूनमधून दिसतात. तृणमूल कांग्रेसचे डेरेक ओ ब्रायन म्हणाले, पंतप्रधान सभागृहात येत नाहीत. धर्मांतराशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालवू दिले जाणार नाही. मोदी देशभरात फिरतात. बोलतात. मग त्यांना संसदेत आपली भूमिका मांडण्यात काय अडचण वाटू लागली आहे, असा सवाल काँग्रेसचे उपनेता आनंद शर्मा यांनी केला. देशात जातीयवादी वातावरण निर्माण करणे आणि ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला. दुसरीकडे ज्यांच्याकडे आधीपासूनच बँक खाते आहे, अशा लोकांना जन-धन योजनेचे लाभ घेण्यासाठी नव्याने खाते काढण्याची आवश्यकता नसल्याचे सरकारतर्फे स्पष्ट केले.

सबसिडी कपातीचा प्रस्ताव नाही
श्रीमंतांच्या एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी बंद करण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ग्राहकांना सबसिडी नाकारून बाजारभावाप्रमाणे सिलिंडर घेण्याचे आवाहन केले आहे. सरकारकडे याबाबतचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे प्रसाद यांनी सांगितले.

अपहरणकर्त्यांना फाशीची शिक्षा देणारे विधेयक
अपहरणकर्त्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असणारे विधेयक सरकारने बुधवारी राज्यसभेत मांडले. विधेयकात हल्ल्यासाठी क्षेपणास्त्रासारखे वापर केले जाणारे विमान पाडण्याचे अधिकार सुरक्षा जवानांना देण्यात आले आहेत. हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपथी राजू यांनी राज्यसभेत अपहरणविरोधी दुरुस्ती विधेयक २०१४ राज्यसभेत मांडले. विरोधकांनी जातीय हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवर पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी करत गोंधळ घातला. यादरम्यान दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले. विधेयक संयुक्त राष्ट्रांचा बीजिंग मसुद्याशी सुसंगत आहे. या मसुद्यावर भारताने स्वाक्षरी केली आहे. यामध्ये नागरी विमानांचा शस्त्र म्हणून वापर करणा-या अतिरेक्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय विमान आयसी ८१४ चे ११९९ मध्ये झालेले अपहरण तसेच अमेरिकेवर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर बीजिंग मसुदा अस्तित्वात आला.

भारतीय तरुणांचा सहभाग कमी
इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी जाळ्यात भारतीय तरुणांचा खूप कमी सहभाग असल्याची माहिती बुधवारी राज्यसभेत देण्यात आली. एका प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी म्हणाले, सायबर विश्वातील इसिसच्या अस्तित्वामुळे तरुण त्या संघटनेकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येते. सरकारी यंत्रणेचे त्यावर लक्ष आहे. गुप्तचर संस्थांना घातक तत्त्वांची ओळख करून दिली जाईल.