आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पसंख्याक आयोगाला गुजरात दंगलप्रकरणी मोदींच्या हुलकावण्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरात दंगलपीडितांच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी अनेकदा प्रयत्न करूनही मोदी त्यांना भेटले नाहीत. आतातरी 2002 मधील दंगलपीडितांचे पुनर्वसन आणि अन्य मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा होईल, अशी अपेक्षा असल्याचे आयोगाचे अध्यक्ष वजाहत हबीबुल्लाह यांनी म्हटले आहे.

मोदी यांची भेट घेण्याचा यापूर्वी आपण अनेकदा प्रयत्न केला आहे मात्र, काही कारणास्तव ते भेटले नाहीत. 2002 च्या गुजरात दंगलीतील पीडितांचे पुनर्वसन, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि गुजरातमधील पार्सी व शीख समुदायाच्या समस्या आदी प्रश्नांवर मोदींशी आपणास चर्चा करायची आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देण्याच्या केंद्राच्या योजनेवर गुजरात सरकारने आक्षेप घेतला आहे. या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर त्यांच्याशी चर्चा करायची असल्याचे हबीबुल्लाह म्हणाले.