आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाेन्मेष कल्पना : पंतप्रधान रेल्वे कर्मचाऱ्यांशी बोलणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर - भारतीय रेल्वे जागतिक स्तरावरील संस्था करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवोन्मेष कल्पना मागवणार आहेत. यासाठी ते २५ पासून २७ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस शिबिर घेणार आहेत. भारतीय रेल्वेची झोनल रेल्वे व प्राॅडक्शन युनिट सात टीममध्ये विभागली जाणार आहे. त्यात महाव्यवस्थापक व महासंचालक असणार आहेत. प्रत्येक महासंचालकास २० आणि सीएमडीला १०-१० सदस्य निवडण्याचा अधिकार असेल. हे नव्या कल्पना देणारे सदस्य असतील. येत्या दोन महिन्यांत टीम कल्पना विकसित करतील आणि त्या शिबिरात ठेवल्या जातील. पंतप्रधान परिषदेद्वारे २० हजार रेल्वे कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
रेल्वे बोर्डाचे चेअरमन ए.के. मित्तल यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे. पुढील क्षेत्रांमध्ये कर्मचारी कल्पना मांडू शकतील.
खालील मुद्द्यांवर भर
{ सुखकर प्रवासासाठी गाड्यांचा वेग वाढवणे, शिस्त, स्वच्छता, सुविधा आणि सेवेत वाढ.
{ रेल्वे सेवेच्या खर्चात पुढील ५ वर्षांत १० टक्के कमी करणे.
{ भारतीय रेल्वेद्वारे येणाऱ्या १० वर्षांत अंगीकारल्या जाणाऱ्या कल्पना.
{ प्रवासी भाडे वगळता १५ टक्के उत्पन्न वाढवणे व ५ वर्षांत १०० स्थानकांचा विकास.
{ डायनामिक प्राइजिंगद्वारे आगामी ५ वर्षांत ४५ टक्के भागीदारीत वाढ आदींचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...