आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Orders Torn Apart By BJP MP, Shatrughan, Even The Rebellious Tone

मोदींच्या पहिल्याच आदेशाची ऐशी-तैशी, शत्रुघ्न सिन्हांचे मोदी विरोधी सूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिलेल्या पहिल्याच आदेशाची भाजप खासदार ऐशी-तैशी करत आहेत. मोदींनी मंत्र्याना स्टाफमध्ये नातेवाईकांना न ठेवण्याचा इशारा दिला होता. पण त्यांचा हा आदेश त्यांच्याच खासदारांनी धुडकावून लावला आहे. एका खासदारांनी आपल्या वडीलांनाच अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे. तर भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही मोदी विरोधी सूर आळवला आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी सर्व पदांसाठी पात्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथून निवडून आलेल्या भाजप खासदार प्रियंका सिंह रावत यांनी आपल्या वडीलांनाच सर्व शासकीय विभाग आणि मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी प्रतिनिधी नियुक्त केले आहे. आपल्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांबरोबर संपर्क राहावा म्हणून असे केल्याचे स्पष्टीकरण प्रियंका यांनी दिले आहे.

(छायाचित्र - वडील उत्तम राम आणि पती रघुराम यांच्यासह खासदार रावत )
26 मे रोजी जेव्हा नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली होती, त्याच दिवशी रावत यांनी एक सर्कुलर काढून ही नियुक्ती केली होती. रावत यांचे वडील राम हे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. आता ते खासदारांचे प्रतिनिधी म्हणून सर्व बैठकांमध्ये सहभागी होतील आणि विकासकामांची जबाबदारी सांभाळतील. रावत यांनी हे सर्कुलर बाराबंकीच्या सर्व सरकारी विभागांसह, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांनाही पाठवले आहे. प्रियंका यांचे पतीही सरकारी अधिकारी आहेत.
पुढे वाचा...काय म्हणाल्या प्रियंका रावत