आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ए फॉर आदर्श, बी फॉर बोफोर्स, सी फॉर कोलगेट, नरेंद्र मोदींनी शोधली नवी बाराखडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ए फॉर आदर्श, बी फॉर बोफोर्स, सी फॉर कोलगेट आणि डी फॉर दामाद का कारोबार अशी नवीन इंग्रजी बाराखडी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शोधून काढली आहे. हाच भाजपचा निवडणूक अजेंडा राहणार असल्याचे समजते. दरम्यान, त्याला प्रत्युत्तर देताना कॉंग्रेसने म्हटले आहे, की मोदींची बाराखडी एफ पासून सुरू होते. एफ फॉर फेक एन्काऊंटर, जी फॉर जेनिसाईड.

राजस्थानमध्ये प्रचार करताना नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकावरवर कडाडून हल्ला चढविताना पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी रुपयाला रुग्णालयात दाखल केले आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर आता भाजपच्या निवडणूक समितीने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशभरातील भ्रष्टाचाराचा भस्मासूर आणि बेजाबदार शासनाला केंद्र सरकार जबाबदार आहे, असे या समितीने म्हटले आहे.

सुशिलकुमार शिंदे मोदींना म्हणाले, रामू, शामू, दामू... वाचा पुढील स्लाईडवर...