आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकर संक्रातीची देशात धूम: जयपूरमध्ये 40 कोटींची उलाढाल, पाटण्यात लालूंच्या घरी दही-चूडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेशाती बरेलीत पोलिसांनी छापा टाकून मोदींचे फोटो छापलेले पतंग तब्यात घेतले आहेत. - Divya Marathi
उत्तर प्रदेशाती बरेलीत पोलिसांनी छापा टाकून मोदींचे फोटो छापलेले पतंग तब्यात घेतले आहेत.
लखनऊ/नवी दिल्ली/जयपूर- मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर जयपूरमध्ये 40 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. यात 15 कोटी रुपयांच्या पतंग आणि मांजाची विक्री झाली आहे. दुसरीकडे, बिहारमधील पाटण्यात राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालू प्रसाद यादव यांच्या घरी मकर संक्रांतीच्या निमित्ताने दही-चूडा भोजचे आयोजन करण्‍यात आले आहे. सत्ताधारी त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.  

मध्य प्रदेशात आजपासून आनंद उत्सवाला सुरुवात झाली, तर अलाहबादेत मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सकाळी 25 लाख भाविकांनी गंगेत डुपकी लावली आहे.

बरेलीत छापा, मोदींचे फोटो छापलेले पतंग जप्त...
- उत्तर प्रदेशातील बरेलीत पोलिसांनी छापा टाकून मोदींचे फोटो छापलेले पतंग ताब्यात घेतले आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
- उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 
- पतंग विक्रेता इनाम याने सांगितले की, मोदींचा फोटो असलेले पतंग अनेक वर्षांपासून विकण्यात येत आहेत, शुक्रवारी मी 8000 पतंग विकले आहे.

जयपूरमध्ये एका दिवसात 15 कोटींच्या पतंग विक्री
- राजस्थानातील जयपूरमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने 40 कोटींची उलाढाल झाली.
- एकट्या जयपूर शहरात 15 कोटी रुपयांच्या पतंग विक्री झाल्या आहेत. 
- काँग्रेसने शुक्रवारी राज्य सरकारच्या जनविरोधी भूमिकेच्या विरोधात 5100 पतंग वाटप केल्या. 
 
पाटणा येथे लालूंच्या घरी दही-चूडा भोज
- राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या घरी दही-चूडा भोजचे आयोजन करण्‍यात आले आहे.
- लालू आणि राबडीदेवी यांच्या 10, सर्कुलर रोड निवासस्थानी हे भोज ठेवण्यात आले आहे.
- मीडिया रिपोर्ट्‍सनुसार, या कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेतेही हजेरी लावणार आहे.

जदयूच्या बिहार अध्यक्षांच्या घरीही भोज
- जदयूचे बिहारचे अध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांच्या घरी 15 जानेवारीला भोज आयोजित   करण्यात आले आहे.
- यामध्ये नीतीश कुमार, लालू प्रसाद यादव, भाजप नेते शुशील मोदी आणि प्रदेश काँग्रेसचे अध्य़क्ष डॉ. आशोक चौधरी यांच्यासह इतर पक्षातील नेतेही हजेरी लावणार आहेत.
- मागीलवर्षी भाजप आणि वाम दलाने या भोजवर बहिष्कार टाकला होता.
- जदयूच्या भोजसाठी पहिल्यांदा बिहारच्या सर्व जिल्ह्यांतून साहित्य मागवण्यात आले आहे.
 
मध्य प्रदेशात आनंद उत्सवाचे आयोजन
- मध्ये प्रदेशातील आनंद विभागाच्या उत्सवाला 14 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे.
- आनंद उत्सवांतर्गत घरातील गरज नसलेल्या, निरोपयोगी वस्तू नियोजित ठिकाणी जमा कराव्या, असे आवाहन लोकांना करण्यात आले आहे. गरजवंत नागरीक तेथून घेऊन जातील.  
- 8000 पंचायतींमध्ये आनंद उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पंचायत विभागाकडून प्रत्येक पंचायतीला 15000 रुपये देण्यात येणार आहे.
- आनंद उत्सवात फक्त पंचायतींचा खर्च 12 कोटी आहे. शिवाय इतर खर्च मिळून आनंद उत्सवाचा पाहिला कार्यक्रम 15 ते 18 कोटीं रुपयांत होत आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा मकर संक्रात विशेष फोटोज...
बातम्या आणखी आहेत...