आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Put Development\'s Blue Print Of Nation, Commentated On Various Point

मोदींनी मांडली देशाच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट, राष्‍ट्रीय परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशासमोर आपले व्हिजन मांडले. देशाच्या विकासाची ब्ल्यूप्रिंटच आपल्याकडे तयार असल्याचे त्यांनी एक प्रकारे दाखवून दिले. सर्व क्षेत्रांतील विकासावर भाष्य करताना त्यांनी विकासाबरोबरच रोजगार आणि गरिबी निर्मूलनावर भर दिला. पक्षाच्या राष्‍ट्रीय परिषदेच्या समारोपा दिवशी त्यांनी 75 मिनिटांच्या भाषणाचे दोन भागपाडले होते.

पहिल्या भागात लोकसभा निवडणुकीत पराभव निश्चित असल्यामुळेच कॉँग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नसल्याची टीका करत त्यांनी कॉँग्रेसला घेरले. भाषणाच्या दुस-या भागात मात्र देशाला विकासाचे स्वप्न दाखवले. आपले व्हिजन मांडत स्वप्ने जागवतानाच परदेशातील काळा पैसा परत आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. स्मार्ट सिटी, सॅटेलाइट सिटी आणि देश बुलेट ट्रेनने जोडण्याचे लक्ष्य असल्याचे सांगून भारताच्या ब्रँडिंगसाठी त्यांनी फाइव्ह टी फॉर्म्युलाही सादर केला. अशा प्रकारेदेशाच्या भविष्याचे चित्र त्यांनी कार्यकर्त्यांसमोर रंगवले.


उत्साह असणे चांगले, अतिआत्मविश्वास नको : अडवाणी


मोदींनी देशाच्या भविष्याचे चित्र रंगवले
1. महागाई रोखणे आणि किमती स्थिर ठेवण्यासाठी वेगळा निधी उभारावा लागेल.
2. पाच ‘टी’च्या (ट्रेंड, टॅलेंट, टेक्नॉलॉजी, टुरिझम, ट्रॅडिशन) माध्यमातून भारताचे बँ्रडिंग करावे लागेल.
3. देश मॅन्युफॅक्चरिंग हब करू. सगळे जग बाजारपेठ असेल.
4. शेतीवाडीचा रिअल टाइम डाटा जमा करू. अ‍ॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष द्यावे लागेल.
5. देशाच्या चारही दिशांना 2022 पर्यंत बुलेट ट्रेनने जोडावे लागेल.
6. ट्विन सिटी कन्सेप्टवर काम करता येईल. अमेरिकेतील न्यूयॉर्क व न्यू जर्सीच्या धर्तीवर दोन शहरांच्या पायाभूत रचना जोडणे.
7. देशाच्या नव्या पिढीचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारावे लागेल.
8. नद्यांना जोडण्याची योजना पुढे न्यावी लागेल.
9. हेल्थ इन्शुरन्स नव्हे, हेल्थ अ‍ॅशुरन्स (आरोग्याची हमी) द्यावी लागेल.
10. प्रत्येक राज्यात एम्स, आयआयटी आणि आयआयएम उभारावे लागतील.
11. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’वर पूर्ण भर द्यावा लागेल.
12. महिलांना होम मेकरवरून नेशन बिल्डर करावे लागेल.
13. देशभरात ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे पसरवले पाहिजे.
14. प्रत्येक घरात मागणीनुसार वीज पुरवली जाऊ शकते.
15. घोषणांनी नव्हे, विकासानेच गरिबी दूर होईल. गरिबांना समृद्ध करावे लागेल.
16. रेल्वेसाठी तीन युनिव्हर्सिटी स्थापन कराव्यात. रेल्वेवर संशोधन व्हावे.
17. काळाबाजार करणा-यांविरुद्ध विशेष न्यायालये स्थापन केली जातील.

विधानसभा निवडणुकीतील यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हे चांगले आहे, पण 2004 च्या निवडणुकीत अतिआत्मविश्वासामुळेच आमची पीछेहाट झाली हे लक्षात ठेवले पाहिजे. आगामी निवडणुकीत तसे होता कामा नये, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला. उत्साह कायम ठेवतानाच सावधगिरी बाळगतच तयारीला लागले पाहिजे, असे अडवाणी म्हणाले.


राहुल यांची उमेदवारी टाळण्यामागील तीन कारणे
1. लोकसभा निवडणुकीत पराभव निश्चित आहे. त्यामुळे कोणतीही आई (सोनिया गांधी) मुलाचा बळी कशाला देईल?
2. ते (राहुल गांधी) उच्च् कुळातील आहेत. प्रतिस्पर्धी मागास असल्याने त्यांना संकोच वाटत आहे.
3. ते नामदार आहेत आणि मी कामदार. उच्च्-नीच भेदभाव आहे.


बिगर यूपीए सरकारांना चुचकारले
एक मुख्यमंत्री असल्यामुळे काही राज्यांशी भेदभाव केला जातो याची जाणीव मला आहे. भाजप सत्तेवर आल्यास संघरचना भक्कम केली जाईल. केंद्र आणि राज्यांना एक टीम म्हणून काम करावे लागेल.
पंतप्रधान, मुख्यमंत्री, त्यांचे मंत्रिमंडळ आणि नोकरशाहीला एक विशाल टीम म्हणून काम करावे लागेल. यातूनच देशाचा वेगाने विकास होईल. सुशासन निर्माण होईल.