आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Rahul Gandhi Was Beneficiary Of My Hospitality During Ipl

ललित मोदींनी केले ट्वीट; म्‍हटले, राहुल गांधी आणि वाड्रा होते माझे पाहुणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी ट्वीटरच्‍या माध्‍यमातून शनिवारी कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधीवर तोफ डागली. ललित यांनी ट्वीट करून राहुल गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांना प्रश्‍न विचारला, 'आपण माझे पाहुणे झाला होता का आणि याची माहिती आपण कॉंग्रेसला दिली होती का?' त्‍यानंतर त्‍यांनी तत्‍काळ दुस-या ट्वीटमध्‍ये लिहिले, 'ब्रेकिंग न्यूज: राहुल आणि वाड्रा यांच्‍याकडून माझ्या प्रश्‍नांची उत्‍तर मिळण्‍यासाठी वाट पाहा.' या ट्वीट्ससोबत ललित यांनी चार फोटोसुद्धा ट्वीट केलेत. ज्‍यात आयपीएल मॅचच्‍या दरम्‍यान त्‍यांच्‍या सोबत राहुल गांधी आणि रॉबर्ट वाड्रा मैदानात बसलेले दिसत आहेत.
'माझ्या कक्षात बसले होते राहुल'
या मुद़दयावर ललित मोदी यांनी ट्वीट्स करणे सुरूच ठेवले. नंतर केलेल्‍या एक अन्य ट्वीटमध्‍ये त्‍यांनी म्‍हटले, 'ब्रेकिंग न्यूज: मला आशा आहे की, माझ्या पाहुणचाराचा राहुल यांनी फायदा घेतल्‍याचे त्‍यांच्‍या कार्यालयाने भारतीय राष्ट्रीय क्रॉग्रेसला माहिती दिलीच असेल. ते माझ्या सोबत बॉक्‍समध्‍ये (आयपीएल मॅचच्‍या दरम्‍यान मैदानात व्‍हीआयपी व्‍यक्‍तींना बसण्‍यासाठी आरक्षित जागा) बसले होते.
ललित यांना फटकारले तर त्‍यांनी दिले त्‍याचे उत्‍तर
ललित मोदींच्‍या ट्वीटखाली अरुण चौहान नावाच्‍या यूजरने ट्वीट लिहून विचारले की, ज्‍या बॉक्‍समध्‍ये आपण बसला होता त्‍याचे पैसे डीएलएफने दिल्‍याचे आपण विसरलात का ?' त्‍यावर उत्‍तर देताना ललित यांनी लिहिले, 'माफ करा, पण असे काही नाही. मला विशेषाधिकाराने बॉक्स मिळला होता. स्पॉन्सर्ससाठी वेगळा बॉक्स असतो.' शेवटच्‍या ट्वीटमध्‍ये ललित मोदी यांनी लिहिले की, जर काँग्रेस बीजेपीवर आरोप लावत असेल तर त्‍यांनीही तेच केले.