फैजाबाद/ नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे आता दोनच टप्पे शिल्लक असताना नरेंद्र मोदीं राममय झाले. सोमवारी फैजाबादेत (अयोध्येपासून 6 किमी दूर) त्यांची सभा झाली. व्यासपीठावर प्रभू श्रीरामांचे भव्य चित्र होते. एका कोपर्यात नियोजित राममंदिराचे चित्रही झळकत होते. भाषणात मोदींनी रामराज्याचे सतत दाखले दिले. सभा संपताच काँग्रेससोबत सपा, बसपा यांनी निवडणूक प्रचारात धार्मिक प्रतीकांचा वापर केल्याबद्दल आक्षेप नोंदवले. निवडणूक आयोगानेही याची स्वत:हून दखल घेत अहवाल मागवला.
विरोधकांचा आक्षेप काय : व्यासपीठावर श्रीरामाचे भव्य चित्र होते. मोदींच्या भाषणातही क्षणाक्षणाला रामनामाचा जप होता. हे आचारसंहितेचे खुलेआम उल्लंघन असल्याचा विरोधी पक्षांचा आक्षेप आहे
पुढील स्लाइडमध्ये, महिलेवर पाळत; नवे सरकार ठरवणार चौकशीची दिशा