Home »National »Delhi» Modi Reach Loksabha Before 5 Minutes Proceedings

मान्सून सेशनमध्ये वेळेपूर्वीच पोहचले मोदी; सोनियांची भेट, मुलायम यांच्यासोबत कानगोष्टी

दिव्य मराठी वेब टीम | Jul 17, 2017, 17:47 PM IST

  • सोमवारपासून संसदेच्या मान्सून सेशनला सुरुवात झाली.
नवी दिल्ली - पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. विरोधकांनी सरकारला चीनने उकरून काढलेला सीमा वाद, जम्मू-काश्मिर आणि गोरक्षेच्या नावाखाली सुरु असलेला हिंसाचार यावर घेरण्याचा विचार केला आहे. मात्र, अधिवेशन सुरु होण्याच्या काही क्षणआधीचे चित्र हे यापेक्षा फारच वेगळे दिसले. सभागृहाचे कामकाज सुरु होण्याच्या 5 मिनिट आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात पोहोचले. त्यांनी सभागृहात येताच स्वतःहून सोनिया गांधी मल्लिकार्जून खरगे यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. यावेळी मुलायमसिंह यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले आणि त्यांच्या कानात काही सांगितले.
- सोमवारी सकाळी कामकाज सुरु होण्याच्या काही क्षणांपूर्वी मोदी सभागृहात पोहोचले. आल्याबरोबर ते विरोधीपक्ष नेत्यांच्या बाकांकडे वळाले. पहिल्या रांगेत बसलेल्या विरोधीपक्ष नेत्यांची त्यांनी भेट घेतली. हात जोडून त्यांना अभिवादन केले.
- मोदी सोनिया गांधी यांचे अभिवादन स्वीकारण्यासाठी पुढे वळताच त्यांच्या शेजारी बसलेले मुलायम सिंह यादव यांनी मोदींचे आपुलकीने स्वागत केले. मोदींचा हात धरला आणि तसेच उभे राहून 5 मिनिटांपर्यंत पंतप्रधानांशी बातचीत केली. मुलायम आणि मोदींची गुफ्तू सुरू असताना सोनिया गांधी थोड्याश्या बेचैन दिसल्या. तरीही उभे असताना त्या स्मितहास्य देत होत्या.

मुलायम यांचा कोविंद यांना पाठिंबा
- मुलायम सिंह यादव यांनी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देणार अशी घोषणा यापूर्वीच केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, राष्ट्रपतींची निवड सर्वांच्या सहमतीनेच व्हायला हवी कोविंद यांचे विजयी होणे निश्चित आहे. इतरांनीही कोविंद यांनाच मत द्यावे असे आवाहन मुलायम सिंह यांनी केले.
- मुलायम यांच्या व्यतीरिक्त त्यांचे बंधू शिवपाल सिंह यादव यांनी सांगितल्यानुसार, कोविंद त्यांचे शेजारीच आहेत. त्यांना आपण ओळखतो आणि ते धर्मनिरपेक्ष विचारसरणी असणारे व्यक्ती आहेत.

Next Article

Recommended