आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरक खाती एकत्र करून फेररचना!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एकमेकांना पूरक खाती एकत्र करून त्यांची फेररचना करण्याचे धाडस नरेंद्र मोदी यांनी दाखवले आहे. या नव्या रचनेमुळे मंत्र्यांचे महत्त्व वाढणार असून पूरक विभागांची कामे अन्य मंत्र्यांसाठी अडून राहणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही खाती व त्यातील विभाग असे असतील.
1. ऊर्जा : कोळसा, पारंपरिक ऊर्जा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू व ऊर्जा 2. कृषी : कृषी, रासायनिक खत, अन्न प्रक्रिया, ग्राहक प्रकरणे. 3. उद्योग : उद्योग प्रसार, अवजड उद्योग, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, वस्त्रोद्योग 4. ग्रामविकास : ग्रामीण विकास, पंचायत राज, पेयजल, स्वच्छता व आरोग्यविषयक व्यवस्था 5. वाहतूक : रेल्वे, रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी आणि नागरी उड्डयन 6. पोलाद. 7. नियोजन : सांख्यिकी, कार्यक्रम आणि अंमलबजावणी 8. नगरविकास : नगरविकास, घरकुल आणि दारिद्र्य निर्मूलन. 9. परराष्ट्र व्यवहार : परराष्ट्र प्रकरणे, अनिवासी भारतीय 10. वाणिज्य. 11. अर्थ 12. पर्यटन : पर्यटन, ईशान्येकडील भागातील सांस्कृतिक विकास, आदिवासी कार्य 13. पर्यावरण आणि वने. 14. जलसंपदा. 15. खाण. 16. महिला व बालकल्याण.17. युवक व क्रीडा. 18. विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान. 19. कायदा व न्याय. 20. संसदीय कार्य. 21. संरक्षण. 22. माहिती व तंत्रज्ञान : टपाल, प्रसारण, दूरसंचार. 23. आरोग्य. 24. गृह. 25. मनुष्यबळ विकास. 26. कामगार. 27. अल्पसंख्याक.