आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतींच्या पसंतीच्या CBSE प्रमुख पदाच्या उमदेवारावर मोदींनी दोनवेळा मारला काट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्मृती इराणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असताना त्यांनी निवडलेल्या व्यक्तीची सीबीएसई प्रमुख पदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव नरेंद्र मोदींनी नाकारला होता. स्मृतींच्या पसंतीच्या अधिकाऱ्याचा नियुक्ती प्रस्ताव थंड बस्त्यात गुंडाळण्याची ही मोदींची दुसरी वेळ होती. आता या पदासाठी नागरी सेवा मंडळाने नाव नक्की करुन केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात स्मृती इराणींचे खाते काढून घेण्यात आले असून त्यांना आता वस्त्रोद्यग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोण होते स्मृतींची पसंती
- मंत्रिमंडळ फेरबदलाआधी स्मृतींनी डॉ. सर्वेंद्र विक्रम बहादूर सिंह यांची सीबीएसई बोर्डच्या प्रमुख पदी नियुक्तीची शिफारस केली होती.
- पंतप्रधानांच्या नेतृत्वातील अपॉइंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेट (ACC) यावर अंतिम निर्णय घेते.
- मोदीं प्रमुख असलेल्या या समितीने डॉ. सर्वेंद्र सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव सपशेल नाकारला होता.
- डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग (DoPT) यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, 'ACC चे म्हणणे आहे की सीबीएसई प्रमुखांचे पद हे सेंट्रल स्टाफिंग स्कीम (CSS) यांच्याकडूनच भरले जावे.'

2014 पासून सीबीएसई प्रमुख पद रिक्त
- डिसेंबर 2014 पासून सीबीएसई प्रमुख पद रिक्त आहे. या पदावर सह सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते.
- यासाठी अधिकाऱ्याला शिक्षण खात्यातील प्रशासकीय कामांचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- CSSने सीबीएसई प्रमुख पदासाठी राज्यांच्या उप सचिवांकडून आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नावे मागवली आहे.
- सूत्रांच्या माहितीनुसार कॅबिनेट सेक्रेटरीच्या नेतृत्वातील सीएसबीने हिरवा कंदील दाखवल्यानंतर एक यादी तयार करण्यात आली आहे.
- सीएसबीने एक नाव नक्की केल्यानंतर आता त्याला एसीसीच्या मान्यतेसाठी पाठवले जाईल.
- सध्या ऑगस्ट 2015 पासून एचआरडी मध्ये सहसचिव पदी व्ही.एस.के. सेशु कुमार यांच्याकडे सीबीएसईच्या चेअरमनपदाचा पदभार आहे.

ही दुसरी वेळ होती
- ही दुसरी वेळ होती जेव्हा मोदींनी स्मृतीच्या पसंतीच्या अधिकाऱ्याच्या नावावर काट मारला होता.
- ऑगस्ट 2015 मध्ये ACC ने सतबीर बेदी यांच्या नावाचा प्रस्ताव फेटाळला होता.
- ACC ने सर्च कम सिलेक्शन कमिटीचा प्रस्ताव नाकाराण्याचे कारण बेदी यांना तीन वर्षांचा शिक्षण खात्यातील प्रशासकीय कामांचा अनुभव नव्हता.
बातम्या आणखी आहेत...