आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपली आई दुसऱ्याच्या घरची भांडी घासायची : आईविषयी मोदी खोटे बोलले- काँग्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली-आपली आई दुसऱ्याच्या घरची भांडी घासायची, असे मोदींनी खोटेच रेटून सांगितले. आम्ही त्याची खातरजमा करून घेतली आहे. मोदींचे कुटुंब श्रीमंत नव्हते पण ए‌वढेही गरीब नव्हते. त्यांच्या वडिलांचे कँटीन होते. परंतु मोदींनी कधीही चहा विकलेला नाही. असे खोटेनाटे बोलून मोदी यांनी आपल्याच आईचा एका अर्थाने अपमानच केला आहे.’ -आनंद शर्मा, प्रवक्ता
काँग्रेसमध्ये एका आईने नाकर्त्या मुलासाठी पक्ष बरबाद केला : भाजप
पंतप्रधान आपल्या आईची आठवण सांगत होते. मात्र काँग्रेसमध्ये एका आई आपल्या नाकर्त्या मुलासाठी पक्षच बरबाद करत आहे. राहुल भारतीय राजकारणातील बिघडलेले मूल आहे. पंतप्रधानांची आई एका छोट्याशा घरात राहते. महालात नव्हे. देशातील काही आईंना राहण्यासाठी २०-२० महाल लागतात.’ -एम. जे. अकबर, प्रवक्ता

भाऊ म्हणाले खरे आहे- नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद व अमृत मोदींनी नरेंद्रभाईंनी आईबाबत जे सांगितले ते खरे असल्याचे म्हटले आहे. आईने (हिरा बा) दुसऱ्याच्या घरी भांडी घासली. पाणी भरले. प्रल्हाद म्हणाले की, मी पाचवीत शिकत होतो, तेव्हा आमच्या पालनपोषणासाठी आई दुसऱ्याच्या घरी धुणी-भांडी करायची.
चर्चा का ? कारण रविवारी फेसबुक मुख्यालयात आईबाबत विचारलेल्या प्रश्नावर मोदी भावुक झाले आणि डोळे पाणावले होते.

मोदींचा ‘ब्रेन ड्रेन’
आणि ‘ब्रेन गेम’ प्लान
-विकासाचे नवे शिखर गाठण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक गोष्ट सांगू लागलो व रोज दोन- दोन तास बोललो तरी १५ दिवस लागतील.

-‘जाम’ आमचे मिशन आहे. सर्वांसाठी ‘जाम.’ जाम = जे म्हणजे जनधन बँक खाती, ए म्हणजे आधार कार्ड आणि एम म्हणजे मोबाइल गव्हर्नन्स.

-कधी वाटायचे की हा ब्रेन ड्रेन आहे. परंतु आता हे ब्रेन डिपॉझिट आहे, असे मला वाटू लागले आहे. तो संधीच्या शोधात आहे. संधी मिळेल तेव्हा व्याजासह भारत मातेच्या कामी येईल.