आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM म्हणाले- मी दलित हितैषी असणे काही लोकांना पचेना, दलितांवरील अत्याचार खपवून घेणार नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील वाढत्या दलित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वपक्षीयांबरोबरच अन्य नेत्यांना कोणतीही व्यक्ती किंवा समाजाविरुद्ध बेजबाबदार विधाने न करण्याचा सल्ला दिला आहे. आपले सरकार कोणाहीविरुद्ध बदल्याच्या भावनेतून काम करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

एका मुलाखतीत दलितांवरील अत्याचाराचा निषेध करून मोदी म्हणाले की, असे अत्याचार कोणत्याही सुसंस्कृत समाजाला शोभत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत देशाची एकता, सामाजिक ऐक्य आणि समानतेला धक्का पोहोचता कामा नये. काही वर्गाचे ठेकेदार समजले जाणारे लोक सामाजिक समस्यांना राजकीय रंग देत आहेत. त्यांनी ते थांबवले पाहिजे. दलित, शोषित आणि आदिवासींच्या विकासासाठी मी वचनबद्ध आहे.

कोणतीही व्यक्ती किंवा समाजाविषयी बेजबाबदार विधाने करू नका, असे माझे माझ्या पक्षाच्या नेत्यांसह अन्य राजकीय नेत्यांना सांगणे आहे. माझे दलित हितैषी असणे काही लोकांच्या पचनी पडेनासे झाले आहे.त्यामुळे ते सामाजिक प्रश्नांना राजकीय रंग देत आहेत.

जयंतीमुळे पोटदुखी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती मी साजरी केल्यापासून काही लोकांना मोदी आंबेडकरांचे पाईक वाटू लागले. तेव्हापासूनच त्यांची पोटदुखी सुरू झाली, असे मोदी म्हणाले.

राजकीय रंग देणे थांबवा
मोदी म्हणाले, जातीयवादाच्या नावाखाली ज्यांनी या देशात विष कालवले आहे, त्यांनी सामाजिक समस्यांना राजकीय रंग देणे थांबवावे. त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे.

अत्याचार करणारांची खैर नाही
मोदी म्हणाले, दलितांवर अत्याचार अजिबात खपवून घेणार नाहीत. आमच्या विकासाच्या अजेंड्यावर देशाचा संपूर्ण विश्वास आहे.

लोकांना शंका नाही
देशातील लोकांच्या मनांत अजिबात शंका नाही. परंतु ज्यांना आधीचे सरकार जावे असे वाटत नाही, त्यांनाच अडचण आहे. आमचा विकासाचा अजेंडा राजकीय नाही.

विकास हाच अजेंडा
देशाची दारिद्र्यातून सुटका हवी असेल तर गरिबांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. त्यामुळे विकास हाच माझा अजेंडा होता आणि यापुढेही तोच अजेंडा कायम राहील.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधू जाणून घ्या कोण-कोणत्या मुद्द्यांवर बोलले मोदी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...