नवी दिल्ली - केंद्रीतील मोदी सरकार कारगिल युद्धातील शहिद सौरभ कालियासह पाच भारतीय जवानांना न्याय मिळवून देण्यासाठी अंतराराष्ट्रीय न्यायालयाचे दार ठोठावण्यास तयार नाही. काही दिवसांपूर्वी सरकारच्या वतीने संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगण्यात आले, की सध्याच हा मुद्या अंतरराष्ट्रीय न्यायालयात उपस्थित केला जाणार नाही. यामुळे शहीदांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. 56 इंचाची छाती कुठे गेली, असा सवाल त्यांनी केला आहे.
1999 मध्ये कारगिल युद्धा दरम्यान 4 जाट रेजिमेंटचा कॅप्टन सौरभ कालिया यांच्यासह पाच भारतीय जवानांना पाकिस्तानच्या सैनिकांनी सीमेवर पकडले होते. त्यांना बंदिवान बनवून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. या शहीदांच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानच्या सैनिकांवर कारवाईची मागणी केली होती.
संसदेतली प्रश्न आणि सरकारचे उत्तरकॅप्टन सौरभ यांच्यासह पाच जवानांच्या हत्ये संबंधी खासदार चंद्रशेखर यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. केंद्र सरकार या जवानांच्या हत्येचा मुद्दा यूनायटेड नेशन्स आणि मानवाधिकार आयोगासमोर उपस्थित करणार का? शहीद जवानांना न्याय मिळवून देण्यासाठी आयसीजेचे दार ठोठावून पाकिस्तानी सैनिकांवर कारवाईची मागणी केली जाईल का ? या प्रश्नाच्या उत्तरात सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री व्हि.के.सिंह म्हणाले, 'या मुद्यावर अंतरराष्ट्रीय समुहाला कळवण्यात आले आहे. न्यूयॉर्कच्या अधिवेशानात 22 सप्टेंबर 1999 आणि मानवाधिकार आयोगाकडे एप्रिल 2000 मध्ये पाकिस्तानी सैनिकांवर कारवाईची मागणी केली होती. अंतरराष्ट्रीय कोर्टाच्या माध्यामातून कायदेशिर कारवाईबद्दलही विचार करण्यात आला पण ते देखील शक्य दिसत नाही.'
सौरभ कालिया यांच्या वडिलांची सुप्रीम कोर्टात न्यायाची मागणी
शहीद कॅप्टन सौरभ यांचे वडील एन.के.कालिया 16 वर्षांपासून मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत. त्यांनी 2012 मध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांची मागणी आहे, की भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये (आयसीजे )हा मुद्दा उपस्थित करावा जेणे करुन भारतीय जवानांना हालहाल करुन मारणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांवर कारवाई केली जाईल. त्यांचे म्हणणे आहे, की भारतीय सैनिकांसोबत पाकिस्तानने केलेले कृत्य युद्ध बंदी संबंधी झालेल्या जिनेव्हा कराराचे उल्लंघन आहे.
इंटरनेटवर व्हिडिओ
सौरभ कालिया आणि त्यांच्या सहकारी जवानांसोबत झालेल्या गैरवर्तनाचा पाकिस्तानच्या सैनिकांनी स्विकार केला होता. त्यानंतरही मोदी सरकार मागील सरकारचाच कित्ता गिरवत आहे. एन. के. कालिया म्हणतात, 'मला आशा होती की भाजप सरकार देशभक्त आहे. मात्र खेदाने म्हणावे वाटते की परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के.सिंह मागील सरकारचीच भूमिका पुढे मांडत आहेत. खासदार राजीव चंद्रशेखर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलेले उत्तर हे देशभक्तीचा नारा देणारे हे सरकारही कारगिल शहिदांना न्याय मिळवून देण्यात असमर्थ असल्याचे दिसते.'
पुढील स्लाइडवर, डोळे काढले होत, हाडांचा झाला होता भूगा