आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या ताब्यातील काश्मीरची आता ‘पीओजेके’ अशी ओळख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीर अर्थात पीओकेला आता पीओजेके असे नाव दिले जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय घेतला असून गृहमंत्रालयाने यासाठी प्रस्ताव बनावण्याची तयारीदेखील सुरू केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

याला पाक अधिकृत काश्मीर म्हटल्याने या राज्याचे अविभाज्य घटक असलेले लद्दाख आणि जम्मू हे जिल्हे यातून वगळले जातात, असे सरकारचे मत आहे. सूत्रांच्या मते, केंद्रातील नवे सरकार जम्मू -काश्मीरबाबत धोरणात बदल करण्यास उत्सुक आहे.

पीओजेके असे नामकरण केल्यास भारत जम्मू आणि काश्मीरला एकच मानत असल्याचा संदेश जगभरात जाईल, असे केंद्राला वाटते. मात्र, यापूर्वीच्या सरकारच्या एका समितीने या भागाला पीएजेके म्हटले होते तेव्हा भाजपनेच त्याला विरोध केला होता.