आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी- \'ते म्हणतात सरकारने तयारीच केली नाही, त्यांचे दुःख हे की त्यांना वेळ मिळाला नाही\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. - Divya Marathi
संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. मोदी म्हणाले, ते म्हणतात की सरकारने पूर्ण तयारी केली नाही, वास्तविक त्या लोकांचे दुखणे आहे की सरकारने त्यांना तयारी करण्याचा वेळच दिला नाही. संविधान दिनाच्या आदल्यादिवशी एका कार्यक्रमात मोदी बोलत होते. २६ नोव्हेबर हा देशाचा संविधान दिन आहे.
- पंतप्रधान म्हणाले, देश सध्या भ्रष्टाचाराविरोधातील एक मोठी लढाई लढत आहे. देशातील सामान्य नागरिक या लढाईतील सैनिक झाला आहे.
- सर्व सामान्य नागरिकाची भावना आहे की ७० वर्षे कायद्याचा दुरुपयोग करुन काही लोकांनी देशाला रसातळाला नेले आहे.
- विरोधकांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, नोटबंदीवर काही लोक टिका करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की सरकारने पूर्ण तायरी केली नव्हती. मी समजू शकतो, त्यांचा मुद्दा काय आहे. त्यांचे दुःख हे आहे की सरकारने त्यांना तयारी करण्याचा वेळच दिला नाही. जर त्यांना वेळ मिळाला असता तर ते म्हणाले असते की मोदींसारखे कोणीच नाही.
पंतप्रधान आणखी काय म्हणाले
- संविधान दिनाच्या आदल्या दिवशी आयोजित कार्यक्रमात मोदी म्हणाले, आपल्या आयुष्यात भारतीय संविधानाला सर्वाधिक महत्त्व आहे. जेव्हा-जेव्हा आपण संविधानाबद्दल बोलतो तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तीव्रतेने आठवण होते.
- संविधानाच्या कलमांशी तादात्म होण्याची गरज नाही तर त्याच्या आत्माशी एकरूप झाले पाहिजे.
- संविधान दिनाचे महत्त्व विषद करताना मोदी म्हणाले, २६ नोव्हेंबर शिवाय २६ जानेवारी अपूर्ण आहे, हे आपण विसरले नाही पाहिजे. प्रजासत्ताक दिनाची ताकद संविधान दिनात आहे. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन युवा पिढीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नेमके काय म्हणाले मोदी...
बातम्या आणखी आहेत...