आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी पाठवून मोदींनी रैनाला दिल्या शुभेच्छा, लग्नाला येणे शक्य नसल्याचे कळवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - क्रिकेटर सुरेश रैना आज बालपणाची मैत्रिण प्रियंकासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दिल्लीतील लीला पॅलेस येथे होणार्‍या विवाहासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदींनी गुरुवारी दुपारी एका अधिकार्‍याच्या हस्ते रैनाला लग्नाच्या शुभेच्छा पाठवल्या. त्यांनी लग्नाला उपस्थित राहाता येणे शक्य नसल्याचे कळवत शुभेच्छा संदेश पाठविला आहे. पंतप्रधानांनी पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे, 'विवाहासाठी उपस्थित राहण्याचा पूर्ण प्रयत्न आहे, पण येईलच असे सांगता येत नाही.'
सूत्रांच्या माहितीनुसार, अधिकार्‍याने रैना आणि पंतप्रधान मोदींचा संवाद घडवून आणण्याचाही प्रयत्न केला पण, त्यांचे बोलणे होऊ शकले नाही. रैनाने अधिकार्‍यामार्फत पंतप्रधानांना संदेश पाठवला आहे, 'जर आपण आलात तर टीम इंडियाते खेळाडू आपल्याला भेटतील आणि मला विश्वास आहे आपली भेट झाल्याने संघाला प्रेरणा मिळेल.'
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची शुक्रवार - शनिवार असे दोन दिवस बंगळुरु येथे बैठक आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सायंकाळीच बंगळुरु येथे पोहोचले आहेत. रैनाचा विवाह शुक्रवारी दिल्लीतील चाणक्यपुरी येथील लीला पॅलेस येथे होणार आहे.
बालपणीच्या मित्र-मैत्रिणींना बोलावले, भोजन फक्त शाकाहारी
सुरेश रैनाचा भाऊ नरेश याने दिव्य मराठीला दिलेल्या माहितीनुसार, सुरेश रैनाच्या बालपणीच्या मित्रांना निमंत्रित करण्यात आले आहे. नरेश ने सांगितले, की सुरेश रैनाने दिल्लीसह ऑस्ट्रेलियातही लग्नासाठीची खरेदी केली. विवाह सोहळ्यातील भोजनाबद्दल विचारले असता नरेश म्हणाला, सर्व शाकाहारी मेन्यू ठेवण्यात आला आहे. सुरेश रैनाच्या पसंतीबद्दल विचारले तेव्हा नरेश म्हणाला, त्याला साधे जेवण आवडते. त्यामुळे आता तुम्हीच तर्क लावा की पाहुण्यांना काय-काय वाढले जाईल.
300 व्हीव्हीआयपींना निमंत्रण
नरेश रैनाने सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह टीमचे सर्व सदस्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्यासोबतच सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, नवज्योतसिंग सिद्धू, कपील देव, रवी शास्त्री, सौरभ गांगुली, राहुल द्रविड या टीम इंडियाच्या माजी स्टार्सलाही निमंत्रित करण्यात आले आहे. बीसीसीआयचे अधिकारीही लग्नाला येण्याची शक्यता आहे. जवळपास तीनशे ते साडेतिनशे व्हीव्हीआयपींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. व्हीव्हीआयपींशिवाय लखनौ, फैजाबाद, कानपूर आणि सुलतानपूर येथूनही अनेक पाहुणे येणार आहेत.
फोटो - गाझियाबाद येथील रैनाच्या निवासस्थानी साखरपुडा झाला, त्या दिवशी असा होता सुरेश रैनाचा लुक
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सुरेश रैनाच्या साखरपुडा आणि विवाहासंबंधीची छायाचित्रे