नवी दिल्ली - या महिन्यात दोन योग आहेत. एक म्हणजे १७ सप्टेंबरला पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस याच दिवशी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा अहमदाबाद दौरा. मोदींनी जपान दौरा गाजवला. मग चीन नाराज व्हायला नको! म्हणूनच जिनपिंग यांच्या स्वागताची अहमदाबादेत जय्यत तयारी सुरू आहे. मांसाहारी खाद्यसंस्कृतीत वाढलेल्या चिनी नेत्यासह चमूला बाजरीच्या भाकरीसह फक्त शुद्ध शाकाहारी मेनूचा आस्वाद येथे लुटता येईल.
गुजरातीपदार्थांची असेल रेलचेल : जिनपिंग आणि मोदी साबरमती रिव्हर फ्रंट येथे डिनर करणार आहेत. त्यात एकही चायनीज नॉन-व्हेज पदार्थ असणार नाही. भोजनात १०० हून अधिक गुजराती पदार्थ असतील. त्यामध्ये बाजरीची भाकरी आणि मसाला भात असेल. याशिवाय सूप पासून डेझर्टपर्यंत सर्वकाही असणार आहे. जवळपास २५० पाहुण्यांसाठी गुजराती आणि काठेवाडी पदार्थांची मेजवानी असणार आहे.
डिनरमध्ये असे पदार्थ
- १० पेक्षा जास्त प्रकारचे आइस्क्रीम, पहाडी खीर, लस्सी, मसाला ताक.
- भाकरी, बिस्कीट, रोटला, वघारेलो रोटला, हांडवा, ढोकळा, पात्रा, लिलवानी कचोरी.
- भरीत, लसूण-बटाटा भाजी, शेव-टोमॅटो भाजी, थेपला, कैरीचे लोणचे.
- आमरस, पुरणपोळी, श्रीखंड, मठ्ठा, रस मलाई, डाळ-भात, कढी, मसाला खिचडी.
साबरमती तीरावर चालता चालता चर्चा
जिनपिंगयांना मोदी साबरमती रिव्हर फ्रंटच्या दौऱ्यावर घेऊन जातील. रिव्हर फ्रंटवर मोदी आणि जिनपिंग जवळपास एक किमीचा फेरफटका मारतील. चालता-चालता चर्चाही होईल.
नियोजन मोदींच्या देखरेखीखाली
जिनपिंगयांच्या पाहुणचारात को णतीही कमतरता राहू नये यासाठी त्यांच्या निवास व्यवस्थेपासून त्यांचा लंच डिनर कार्यक्रम स्वतः पंतप्रधान मोदींच्या देखरेखीखाली ठरवण्यात आला आहे.