आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी-शहा यांच्या हेरगिरी प्रकरणाचीही चौकशी करा; आशुतोष यांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सीडी प्रकरणी दिल्लीचे माजी मंत्री संदीपकुमार यांचे समर्थन करून वादात सापडलेले आपचे नेते आशुतोष यांनी स्वत:चा बचाव करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव यात घेतले आहे.

आशुतोष गुरुवारी आयोगासमोर हजर झाले. त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे भाजप अध्यक्ष अमित शहा पंतप्रधान मोदींच्या चौकशीची मागणी केली. मोदी शहांनी एका महिलेची हेरगिरी केली होती, या प्रकरणात त्यांचीही चौकशी करावी, असे आशुतोष म्हणाले. आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्याचे आशुतोष यांनी सांगितले.

एका लेखात संदीपकुमार यांचा बचाव करताना आशुतोष यांनी नेहरू, गांधी वाजपेयींच्या नावाचेही संदर्भ दिले होते. हा महिलांचा अपमान असून आशुतोष यांना हजर राहण्याचे आदेश महिला आयोगाने दिले होते. घटनेने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, असा युक्तिवाद आशुतोष यांनी आयोगासमोर केला. आयोगाचे समन्स आपला हा अधिकार नाकारणारे असल्याचे ते म्हणाले. त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याचे कुमारमंगलम यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...