आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi, Shah\'s Photo\'s On Cup Using For Tea In Shatabdi Express

शताब्दी एक्सप्रेसमध्ये चहासाठी मोदी-शाह यांचे फोटो असलेले कप वापरल्याने वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली-अमृतसर शताब्दी एक्सप्रेसमध्ये चहा पिणार्‍या लोकांना चहाचे कप पाहून धक्का बसला. त्याचे कारण म्हणजे कपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे फोटो छापलेले होते. तसेच कपवर हिंदीत, 'भाजप के सदस्य बनें, साथ आएं, देश बनाएं' असा प्रचार करण्यात आला आहे. त्यावरून वाद सुरू झाला आहे.
फोटो - चहाच्या कपवर असलेला मोदी आणि शहा यांचा फोटो.
हेही वाचा, भाजपने आपला विचारले आणखी 5 प्रश्न
केव्हापासून होतोय वापर
शताब्दी एक्सप्रेसमध्ये केटरींग सर्व्हीस देणार्‍या फर्मच्या एखा कर्मचार्‍यांनी सांगितले की, सुमारे गेल्या आठवडाभरापासून या कपमध्ये चहा सर्व्ह केला जात आहे.
कप आले कसे?
भाजपची जाहिरात असलेल्या या कपवर संकल्प फाऊंडेशन नावाच्या एनजीओचे नाव छापलेले आहे. शताब्दीमध्ये केटरींगचा कंत्राटही याच एनजीओशी संलग्न असलेल्या लोकांकडे आहे. संकल्प फाऊंडेशनचे वरीष्ठ उपाध्यक्ष राजीव मित्तल यांनी याबाबत बोलताना सांगितले की, 'हे कप प्रचारसभांमध्ये वापरले जातात. पण चुकून ते रेल्वेमध्ये वापरण्यात आले. रेल्वेमध्ये स्वच्छ भारत अभियानाचे कप पाठवायचे होते. पण त्याऐवजी चुकीचे कप पाठवण्यात आले. गए।'

रेल्वे अधिकार्‍यांचे म्हणणे काय?
रेल्वेचे फिरोजपूर विभागाचे डीआरएम नरेश चंद्र गोयल म्हणाले की, 'रेल्वेने कोणालाही अशा कपच्या वापराची परवानगी दिलेली नाही. रेल्वेचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी करता येऊ शकत नाही. मी त्यांना (राजीव मित्तल) याबाबत ताकीद दिली आहे. त्यांच्यावर दंड आकारण्याबाबत चेतावणीही दिली आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, सप्लाय करण्यात आलेल्या कपचे PHOTO