आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Slogan In Nomination Of Kejriwal Aap Cancel Ticket Of Two Candidate

केजरीवालांची उमेदवारी दाखल करताना \'मोदी-मोदी\'च्या घोषणा, कार्यकर्त्यांमध्ये तणाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - कार्यालयाबाहेर असलेले आप आणि भाजपचे कार्यकर्ते
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, यावेळी मोदींच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या 'मोदी-मोदी' च्या घोषणाबाजीमुळे ते चांगलेच हैराण झाले. मंगळवारी रोड शोमुळे उशीर झाल्याने केजरीवाल यांना अर्ज दाखल करता आला नव्हता.

बुधवारी केजरीवाल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. त्याचवेळी त्यांच्या विरोधात भाजपने उमेदवारी दिलेल्या नुपूर शर्मा याही त्याठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाने एकच घोषणाबाजू सुरू केली. त्यांच्या घोषणांना आपच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजीने उत्तर दिले. त्यामुळे काही वेळ दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलेल्या दोन उमेदवारांची उमेदवारी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे रद्द केली आहे.
उमेदवारी रद्द करणे योग्य - केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांनी दोन उमेदवारांचे तिकिट कापल्याचे समर्थन केले आहे. दोघांच्या विरोधात असलेले आरोप चौकशीअंती योग्य ठरले आहेत. एका उच्चस्तरीय समितीला या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत मेहरोली चे उमेदवार चौधरी गोवर्धन सिंह आणि मुंडका येथील उमेदवार राजेंद्र दबास यांची उमेदवारी रद्द केली आहे. काही दिवसांपूर्वी समितीने पक्षाच्या लोकपालकडे चौकशी अहवाल सोपवला होता.

उमेदवारी रद्द केलेल्या उमेदवारांचा आरोप, पक्षाने मागितले होते दोन कोटी
दरम्यान, उमेदवारी रद्द झालेल्या उमेदवारांनी पक्षावर पलटवार केला आहे. मेहरोलीचे उमेदवार गोवर्धन सिंह म्हणाले की, पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. हा पैसा न मिळाल्याने तिकिट कापण्यात आल्याचा आरोप त्याने केला. पक्षाने बळजबरी उमेदवारी दिल्याचा आरोपही केला. खाप समाजातील नेते असल्यामुळे आपला त्याचा फायदा उचलायचा होता, असे ते म्हणाले. तर दुसर्‍या एका उमेदवाराने मनीष शिसोदियांवरही आरोप केला आहे.

17 उमेदवारांची चौकशी सुरू
आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 17 उमेदवार चौकशीच्या फेर्‍यात आहेत. आरोप असलेल्या उमेदवारांची पक्षातील लोकपालामार्फत चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले. चौकशीत आणखी एका उमेदवाराविरोधात आरोप खरे असल्याचे समोर येत आहे. संध्याकाळपर्यंत त्याचीही उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. नव्या उमेदवारांची घोषणा लवकरच करणार असल्याचे आपतर्फे स्पष्ट करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTO