(फाइल फोटोः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाळ)
नवी दिल्ली-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळातील 44 मंत्र्यांच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेऊन आहेत. पंतप्रधान मोदी यासाठी विश्वासू व्यक्तीची निवड केल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाळ यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी मंत्रालयात टेळाळणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कॅबिन बाहेर दोन सुरक्षा रक्षकांना या कामासाठी तैनात करण्यात आले आहे. पीयूष गोयल यांच्या कामकाजावरही लक्ष ठेवले जात आहे. एवढेच नाही तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही बारीक लक्ष ठेवले जात असल्याची माहिती मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सर्व मंत्री सतर्क झाले आहेत. मंत्री आपल्या कारमध्ये बसण्यापूर्वी संपूर्ण पाहणी करत असल्याचीही माहिती मिळाली आहे. या कामात काही मंत्री महोदयांनी खासगी प्रोफेशनल्सची मदत घेत असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
सरकारी अधिकार्यांच्या माध्यमातून मंत्री आणि मंत्रालयावर लक्ष...
महत्त्वाच्या खात्याच्या मंत्रालयात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही, यासाठी नरेंद्र मोदी हे खूप काळजी घेत आहे. मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर मंत्रालयातील कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी खास आणि विश्वासू सरकारी अधिकारी नियुक्त केला आहे. विशेष म्हणजे मोदींनी ज्या अधिकार्यांवर जबाबदारी सोपवली आहे, त्यातील बहुतेक अधिकारी गुजरातमधील आहेत. यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात बेकायदा कोणतेही काम न झाल्याचे दावा मोदी नेहमी करतात.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अरुण जेटलीयांच्या कामकाजावरही आहे नरेंद्र मोदींचे लक्ष...