आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माेदींनी‘झापल्याची’बातमी भाजप खासदाराने फाेडली? शिवसेनेला संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जिल्हा बँकेच्या प्रश्नासंदर्भात मंगळवारी साकडे घालण्यासाठी गेलेल्या शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाला पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीच खडे बाेल सुनावल्याचे वृत्त बुधवारी सर्वच माध्यमांमध्ये प्रकाशित झाले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेना खासदारांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन या वृत्ताचे खंडन केले. दरम्यान, माेदी व शिवसेना खासदारांत झालेल्या चर्चेचा तपशील मुंबईतील भाजपच्या एका खासदारानेच माध्यमांना पुरविला असून त्यातून या अतिरंजित बातम्या प्रसिद्ध झाल्याचा संशय शिवसेना नेत्यांना अाहे.

‘पंतप्रधान माेदींसाेबत अामची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाली. परंतु माध्यमांनी या भेटीचे खाेडसाळपणे वार्तांकन केले. यामागे नेमका काेण अाहे याचा शाेध अाम्ही घेत अाहाेत,’ असे स्पष्टीकरण शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी दिले. तसेच ‘अाम्ही भाजपचे नाही, तर शिवसेनेचे खासदार अाहाेत. अाम्हाला फटकारण्याचे अधिकार केवळ उद्धवजींनाच अाहेत,’ असा टाेलाही त्यांनी लगावला.

‘वर गेल्यानंतर मला बाळासाहेबांना उत्तर द्यावे लागणार अाहे, त्यामुळे सामान्य जनतेला वेठीस धरणारे काेणतेही काम मी करणार नाही,’ असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाशी बाेलताना केले हाेते. परंतु ‘तुम्ही वर गेल्यावर बाळासाहेबांना काय उत्तर देणार?’ असे वक्तव्य माेदींच्या ताेंडी टाकून त्या बातम्या माध्यमांनी रंगविल्याचा दावा राऊत यांनी संसदेतील पक्ष कार्यालयात अायाेजित पत्रकार परिषदेत केला. या वेळी पक्षाचे लाेकसभेतील गटनेते अानंदराव अाडसूळ, चंद्रकांत खैरे, कृपाल तुमाणे, गजानन कीर्तिकर, शिवाजीराव अाढळराव पाटील, राहुल शेवाळे हे खासदारही उपस्थित हाेते.
अाडसूळ म्हणाले, ‘नाेटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य माणूस, शेतकरी, छाेटे व्यापारी, भाजीपाला विक्रेते यांची ससेहाेलपट हाेत असून सर्वत्र अनागाेंदी सुरू अाहे. विशेष म्हणजे जिल्हा सहकारी बँक अाणि सहकारी बँकांना सर्व व्यवहार करण्यास रप्रतिबंध घातल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाेत अाहे अाणि त्यामुळे अात्महत्या सुरू हाेण्याचे भय वाटते, असे अाम्ही पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात म्हटले अाहे. जिल्हा बँकेवरील बंदी त्वरित उठवावी, अशी अाग्रहाची मागणीही त्यात केली हाेती. या भेटीचा सकारात्मक परिणाम झाला असून पंतप्रधानांनी सहकारी बँकांचेे व्यवहार सुरळीत हाेण्यासाठी २१ हजार काेटी रुपये ‘नाबार्ड’मार्फत देण्याचा निर्णय घेतला अाहे. हा शिवसेनेचा िवजय अाहे. माेदींनी शिवसेनेच्या खासदारांना फटकारले असते तर अाजचा निर्णय झाला नसता,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

अर्थमंत्र्यांनाही माेदींनी विश्वासात घेतले नव्हते : राऊत
‘माेदींनी तुम्हाला विश्वासात घेतले नाही. याचे तुम्हाला शल्य अाहे का?’ या प्रश्नावर राऊत म्हणाले, माेदींनी नाेटाबंदीचा निर्णय घेताना घटक पक्षांना विश्वासात घेणे अत्यावश्यक हाेते. परंतु त्यांनी त्यांच्या िवत्तमंत्र्यांनाही िवश्वासात घेतले नाही. घटक पक्षांना िवश्वासात घेतले असते तर अाज जी अराजकतेची स्थिती निर्माण झाली अाहे ती एवढ्या माेठ्या प्रमाणात झाली नसती. जनतेच्या प्रश्नांसाठी अाम्ही काेणत्याही पक्षाची दारे ठाेठावू, असे उद्धव ठाकरे यांनी अाधीच जाहीर केले हाेते. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाकिस्तानातून अालेल्या नाहीत. त्यांचा अाणि अामचा विषय एकच असल्याने अाम्ही त्यांच्यासाेबत राष्ट्रपतींकडे गेलाे. राष्ट्रपती हे अामचे पालक अाहेत. सरकारने चुकीचे काही निर्णय घेतले असतील तर ते बदलण्याचे घटनात्मक अधिकार त्यांना असल्याचेही खासदार संजय राऊत
म्हणाले.

‘बाळासाहेबांनी नेहमीच माेदींना मदत केली’
संजय राऊत म्हणाले, ‘पंतप्रधानांना भेटीच्या वेळी केवळ शिवसेनेचे १२ खासदार उपस्थित हाेते. मग अाम्हाला त्यांनी खडसावल्याचे वृत्त दिले काेणी हा संशाेधनाचा भाग अाहे. शिवसेनेचा काेणताही खासदार असे करू शकत नाही. ही बातमी परसविणारा एकतर शिवसेनेचा द्वेष करणारा असावा. ती व्यक्ती ‘एनडीए’ची शत्रू अाहे. अाम्ही तिचा शाेध घेत अाहाेत. शिवसेना कधीही तलवार म्यान करीत नाही व पक्षप्रमुखांशिवाय काेणालाही घाबरत नाही. बाळासाहेबांनी सातत्याने माेदींना मदतीचा हात िदला,’ असेही ते म्हणाले.

पत्रकारांचे कान भरल्याची कुजबुज
शिवसेनेला सातत्याने लक्ष्य करण्याच्या भूमिकेत असलेल्या मुंबईतील भाजपच्या एका खासदाराने पंतप्रधान व शिवसेना खासदारांत मंगळवारी झालेल्या चर्चेचा तपशील माध्यमांना अतिरंजित स्वरूपात दिला असल्याची शक्यता शिवसेनेच्या ज्येष्ठ खासदारांनी व्यक्त केली. शिवसेनेचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटल्यानंतर मुंबईतून अालेल्या अधिस्वीकृती समितीचे १४ पत्रकार माेदींना भेटले. यातील काही पत्रकारांचे भाजपच्या खासदाराने कान भरले असल्याची कुजबुज शिवसेनेच्या खासदारांमध्ये हाेती.
बातम्या आणखी आहेत...