आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Suffering From 'maunibaba Syndrome' Like Manmohan: TMC

मनमोहनप्रमाणेच मोदीही मौनी, खासदार अहमद यांची खरमरीत टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासारखा (सायलेन्स सिंड्रोम) मौनाचा आजार जडला आहे. दोन सत्ताबाह्य केंद्राच्या समस्येमुळे मनमोहन त्रस्त होते. पंतप्रधान मोदींनाही त्याच समस्येला तोंड द्यावे लागत असून पैकी एक केंद्र नागपूर (संघाचे) आहे, अशी खरमरीत टीका तृणमूल कॉँग्रेसचे खासदार सुलतान अहमद यांनी लोकसभेत केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना ते बोलत होते. मोदी सत्तेत आले त्या वेळी भरपूर अपेक्षा होत्या. परंतु त्यांच्या सरकारला दोन वर्षांतच "धोरणात्मक पंगुत्वाने' ग्रासले. भाजपचे सरकार व मनमोहनसिंग यांच्या सरकारमध्ये काहीच फरक राहिलेला नाही. मोदींनी अल्पसंख्याक, दलितांना सोबत घेण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांनी ते पाळले नाही. मोदींनी कोणत्याच विषयावर ठोस भूमिका मांडली नाही. हरियाणात जाट आरक्षणावरही ते गप्प बसले. दिल्लीपासून अवघ्या ३० किलोमीटरवर हरियाणा आंदोलन पेटले. परंतु ५६ इंचांची छाती असल्याचे सांगणारे मोदी जाट तरुणांचे बळी गेले, इतका मोठा हिंसाचार झाला, ३४ हजार कोटींचे नुकसान झाले तरीही गप्प राहिले. याआधी पाटीदार आंदोलनातही ते असेच मौनी बनले होते.

मान राखण्याच्या वृत्तीमुळे मनमोहन सिंग कमकुवत बनले. तर मोदी एरवी गप्प तर बसतात िकंवा िवदेश दौऱ्यावर तरी जातात, अशी टीकाही अहमद यांनी केली. तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. तरुणांना कौशल्य विकासाचे धडे देण्यात सरकार कमी पडले. त्याबाबतच्या योजना "फ्रॉड' आहेत असा आरोपही अहमद यांनी केला.

मोदींनी ममतांकडून शिकावे : अहमद यांनी त्यांच्या भाषणात प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून शिकण्याचा सल्ला दिला. ममतांनी दलित, अल्पसंख्याकांसह सर्व समाजासाठी काम करताना एक आदर्श प्रस्थापित केला. पण भाजपच्या राज्यात कुणीही समाधानी नाही.