आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Supporters Are Attacking In Daughter Of Amrtya Sen For Being Topless

अमर्त्य सेन यांच्या \'टॉपलेस\' कन्येवर मोदी समर्थकाचा शाब्दीक हल्लाबोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी अयोग्य म्हणणार्‍या नोबेल पुरस्कार विजेते, अर्थतज्ज्ञ डॉ.अमर्त्‍य सेन यांच्यावर मोदी समर्थकांकडून चौफेर टीका सुरु झाली आहे. भाजपचे खासदार चंदन मि‍त्रा यांनी तर सेन यांच्याकडून 'भारतरत्‍न' काढून घेण्याची मागणी केली असताना आता तर मोदी समर्थकांनी अमर्त्‍य सेन यांची कन्या आणि अभि‍नेत्री नंदना सेन हिला टार्गेट केले आहे. नंदना सेन हिच्या टॉपलेस छायाचित्रावरून सोशल मीडियात 'टिप्पणी' युद्ध सुरु झाले आहे.
मोदी समर्थकांनी सोशल नेटवर्किंग वेबसाइट 'फेसबुक'वर अमर्त्य सेन यांच्या कन्येचे टॉपलेस छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्राखाली अगदी खालच्या शब्दात टीका करण्यात आली आहे. अभिनेत्री नंदना सेन हिने रॉयल अकादमी ऑफ ड्रामाटि‍क आर्ट तसेच हॉर्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले आहे.

अमर्त्य सेन अमेरिकेत राहतात. ते भारतात मतदार करतात काय? असा सवाल करत त्यांच्याकडून 'भारतरत्न' काढून घेतला पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार चंदन मित्रा यांनी केली होती. परंतु, मित्रा यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे सांगून भाजपने कानावर हात ठेवले होते. यानंतरही चंदन मित्रा थांबले नव्हते, मित्रा म्हणाले, 'अमर्त्य सेन स्वत:ची उपजिवीका चालवण्यासाठी अर्थतज्ज्ञ म्हणून स्वत:ची विचारधार कॉंग्रेसला विकतात. 'भारतरत्न' हे संपूर्ण देशाचे आभूषण आहे. भारतरत्न विजेत्या व्यक्तीने एखाद्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याविरुद्ध असे वक्तव्य करणे चूकीचे आहे. डॉं.सेन यांनी कॉंग्रेसच्या हातातील बाहुले होऊ नये.'
भाजपच्या कार्यकाळात अमर्त्य सेन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. आगामी भाजप सरकारने सेन यांच्याकडून 'भारतरत्न' काढून घेतला पाहिजे, या चंदन मि‍त्रांच्या वक्तव्यावर सेन यांनी तत्काळ प्रतिक्रीयाही दिली होती. सेन म्हणाले, 'भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयींनी सांगितले तर भारतरत्न परत करेल'.
कॉंग्रेसचे प्रवक्‍ता मनिष ति‍वारी यांनी अमर्त्य सेन यांच्या मदतीला धावून आले होते. अमर्त्य सेन यांची चूक तरी काय? असा सवालही तिवारी यांनी उपस्थित केला होता. एका भारतीय नागरिकाच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचेही तिवारी म्हणाले होते. राजकीय आरोपप्रत्यारोपात सुरु असताना मोदी समर्थकांनी नंदना सेनविरुद्ध तिचा अभि‍नय आणि तिच्या व्‍यवसायि‍कतेवरून सोशल नेटवर्किंग वेबसाइट्सवर मोर्चा उघडला आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, 'अमर्त्य सेन यांची कन्या नंदना सेच्या खासगी आयुष्याबाबत...'