आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपुरमध्ये मोदी गरजले, काँग्रेसकडे नेता - निती - नैतिकतेचा अभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आगामी निवडणूकीत भारतीय जनता पक्षासह संघाला ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास आहे ते गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे. जयपूर येथे आयोजित भाजपच्या सुरा्ज्य संकल्प संमेलनात मोदींनी, काँग्रेस विषाचे घोट घेऊन सत्तेवर मांड टाकून बसली असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, काँग्रेसकडे नेता, निती आणि नैतिकता नाही. जो पर्यंत ते सत्तेवर राहातील भ्रष्टाचार संपणार नाही.

मोदींनी केंद्रातील युपीए आणि राजस्थानमधील अशोक गहलोत यांच्यावर जोरदार निशाणा साधत आरोप केला, की देशाच्या विकासात काँग्रेसने खोडा घातला आहे. त्यांच्याकडे नेता नाही, धोरण नाही आणि आता नैतिकताही शिल्लक राहिलेली नाही. त्यांनी युवक मतदारांना आवाहन केले, की राजस्थानमधील युवकांना जर वाटत असेल देशाचे भविष्य बदलावे तर, त्यांनी ते स्वतःच्या हाताने लिहावे. दिल्लीतील सरकार देशहिताचा निर्णय घेण्यास सक्षम नाही. या सभेसाठी लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. मोदींसोबत मंचावर वसुंधरा राजे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह उपस्थित होते.

पुढील स्लाइडमध्ये, मोदीच होणार पंतप्रधान