आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi To Hold Four Rallies Between Jan 31 And Feb 4

भाजप केजरीवालांना घाबरला, बदलली रणनिती; केंद्रातील मंत्र्यांकडे सोपविली जबाबदारी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- किरण बेदींना सीएमपदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर पक्षात जुन्या नेत्यांत व पदाधिका-यांतील नाराजी पाहता भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने प्लॅन बदलला आहे. दिल्ली हे देशाचे ह्दय मानले जाते. त्यामुळे देशाचे ह्दय जिंकण्यासाठी भाजपने स्थानिक नेत्यांऐवजी आता केंद्रातील बड्या नेत्यांवर जबाबदारी सोपविली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे मोदींच्या प्रचारसभा यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची प्रचाराची जबाबदारी अरूण जेटली यांच्याकडे दिल्याची चर्चा राजधानीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूण जेटली आजपासून (बुधवार) दिल्ली प्रदेश भाजप कार्यालयात तळ ठोकणार आहेत. कोळसा मंत्री पीयूष गोयल यांना वीजेबाबत आम आदमी पक्षाकडून केले जात असलेले दावे फेटाळून लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा चेहरा व केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांना या निवडणुकीत दूर ठेवण्यात आले आहे.
पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीतील स्थानिक नेत्यांना प्रचार सभांचे नियोजन सोडता इतर कोणतेही जबाबदारी दिली नाही. नुकत्याच पूर्व दिल्लीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी तिकीट वाटपावरून नाराजी व्यक्त करीत काही प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांची उत्तरे देण्यास भाजपच्या दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी असमर्थ राहिल्या होत्या. या बैठकीनंतर दिल्ली भाजपमधील गटबाजी उफाळून आली होती तसेच स्थानिक नेते व पदाधिका-यांतील असंतोष पाहता निवडणुकीची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांवर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आम आदमी पक्षाला भाजपपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भाजपने रणनितीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आपच्या प्रचारसभांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री राम लाल यांच्यावर जबाबदारी दिली गेली आहे तर मिडियाला संभाळण्याची जबाबदारी मंत्री निर्मला सितारामण यांच्याकडे दिली गेली आहे. अल्पसंख्यांक लोकांपर्यंत पोहचण्याची जबाबदारी माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांच्याकडे आहे.
पुढे वाचा, 14 जिल्ह्याची 14 केंद्रीय मंत्र्यांवर जबाबदारी, मोदींच्या चार सभांची जबाबदारी जेटलींकडे वाचा.. सविस्तर...