आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारची पहिली भव्य योजना सुरू, सहा महिन्यात 7.5 कोटी खाते उघडणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक सेवांनी जोडण्यासाठी त्यांचे बँक खाते उघडण्याशी संबंधीत पंतप्रधान जन-धन योजनेचे उदघाटन आज (गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात केले.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वेचे मुद्दे
- देशातून गरीबी संपवायची असेल तर, प्रथम देशातील आर्थिक अस्पृष्यता संपवावी लागेल. त्याची सुरवात या योजनेच्या माध्यमातून होत आहे.
- माझे मत आहे, की कोणीही बँक खाते उघडले तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा हिस्सा होण्याच्या प्रक्रियेतील त्याचे ते पहिले पाऊल आहे.
- ग्रामीण भागातील महिला महत् प्रयासाने पैशांची बचत करतात. मात्र, घरातील पुरुष जर व्यसनी असेल तर तिला ते पैसे लपवून ठेवावे लागतात. जन - धन योजना अशा महिलांना बँक खाते आणि आर्थिक शक्ती देईल.
- योजनेमुळे गरीबांना गरीबीशी लढण्याची शक्ती मिळेल. ही संपूर्ण योजना गरीबी मिटविण्यासाठी उपयोगी ठरेल.
- 26 जानेवारी पर्यंत खाते उघडे तर, एक लाख रुपयांच्या विम्यासह 30 हजारांचा अतिरिक्त विमा देखील मिळेल.
- देशाला स्वातंत्र्य मिळून 68 वर्षे झाली आहे. मात्र, 68 टक्के लोक अजून देशाच्या अर्थव्यवस्थेशी जोडले गेलेले नाही.
मोदी म्हणाले, 'देश आर्थिक अस्पृश्यतेतून मुक्त होण्याची गरज आहे. त्यासाठी टाकण्यात आलेले हे पाऊल आहे. या योजनेमुळे अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करता येणार आहे.' शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यामध्ये या योजनेची मदत होईल असा, दावा पंतप्रधानांनी व्यक्त केला.
देशातील राष्ट्रीयकृत बँकानी गुरुवारी जवळपास 60 हजार कँप लावले होते. ही योजना देशातील 600 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी सुरु करण्यात आली आहे. देशातील 20 मुख्यमंत्री विविध ठिकाणी या योजनेच्या शुभारंभासाठी उपस्थित होते. योजनेच्या शुभारंभाच्या दिवशी एक कोटी खाते उघडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, जन-धन योजना उदघाटन कार्यक्रमाची छायाचित्र आणि योजनेविषयी इत्यंभूत माहिती