आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi To Leave For A 6 Nation Trip To Attend BRICS SCO Meet

रशियात भेटणार मोदी आणि नवाज शरीफ? आजपासून पंतप्रधान सहा देशांच्‍या दौ-यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवार) रशिया आणि मध्‍य आशियातील पाच देशांच्‍या सात दिवशीय दौ-यावर जात आहेत. यामध्‍ये कजाकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उज्बेकिस्तान या देशांचा समावेश आहे. उज्बेकिस्तानपासून त्‍यांचा दौ-याची सुरुवात होणार आहे. दरम्‍यान, ब्रिक्स आणि शंघाई शिखर संमेलनामध्‍ये भाग घेणार आहेत. या ठिकाणी त्‍यांची पाकिस्‍तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्‍यासोबत भेट होऊ शकते.
पंतप्रधान कार्यालयाच्‍या माहिनुसार, ‘ताशकंदमध्‍ये आपले लोकप्रिय पंतप्रधान लालबादूर शास्‍त्री यांचे निधन झाले होते. त्‍या ठिकाणी जावून नरेंद्र मोदी नतमस्‍तक होणार आहेत. शिवाय उज्बेकिस्तान आणि भारतामध्‍ये व्‍यापार वाढावा यासाठी अनेक महत्‍त्‍वाच्‍या करारावर स्‍वाक्षरी केली जाणार आहे’, अशी माहिती त्‍यांनी दिली. त्‍यानंतर 7 ते 8 जुलैला पंतप्रधान किर्गिस्तानला जातील. 8 जुलैच्‍या रात्री ते रशियाला पोहोचतील. तिथून सरळ तुर्कमेनिस्तानला रवाना होतील. 12 जुलैला किर्गिस्तान पोहोचतील. तजाकिस्तानमध्‍ये त्‍यांच्‍या दौ-याचा समारोप होणार आहे.