आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi To Visit Vaishno Devi Arrived, Three Rallies Today

केजरीवाल पाकिस्तानचे एजंट- नरेंद्र मोदी; काँग्रेस- अॅंटनींवरही हल्लाबोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- धर्मनिरपक्षतेच्या नावाखाली देशाला फसवण्याचे दिवस आता संपले आहेत. आता लोकांना विकास हवा आहे. घराणेशाही, वंशवाद संपविण्याची गरज आहे. देशातील लोकांचे विकासासाठी समाधान होणार नाही असे सांगत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी वैष्णवी देवीचे दर्शन घेऊन आपल्या आगामी भारत विजय अभियानास सुरुवात केली. उधमपूर-डोडा सीटवरून लढत असलेले भाजपचे उमेदवार डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासमवेत मोदी वैष्णवी देवी मंदिरात दर्शन घेऊन हिरापूर येथे प्रचारसभेला पोहचले. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेससह जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांच्यावर हल्ला केला.
मोदी म्हणाले, काँग्रेसने आतापर्यंत केवळ धर्मनिरपेक्षतेचे कार्ड खेळले व त्यामुळेच काँग्रेस आता केवळ त्यापुरतीच उरली आहे. काँग्रेसने विकासाचे राजकारण कधीच केले नाही. काँग्रेस एक विचार असल्याच्या राहुल गांधींच्या टीकेला उत्तर देताना मोदी म्हणाले, काँग्रेसला आता कसलाही विचार राहिलेला नाही. तर खुद्द काँग्रेसच विचारात पडली आहे. गेल्या 4 दशकातून पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या हजारो नागरिकांना नागरिकत्व बहाल केले नाही. मात्र, बांगलादेशातून आसाम व परिसरात आलेल्या लोकांना नागरिकत्व बहाल केले. आता हे बस्स झाले. मी तुमच्यासाठी लढाई करण्याचे ठरविले आहे. काँग्रेसला तुम्ही 60 वर्षे दिली. मला आता देशाचे 60 महिन्यांसाठी चौकीदार बनवा मग तुम्ही विकासाच्या गोष्टी बघा. कारण माझा एकच ध्यास आहे तो म्हणजे विकास, विकास आणि विकासच...
केजरीवाल, अॅंटनीवर मोदींचा हल्लाबोल- मोदींनी आपल्या पहिल्याच सभेत अरविंद केजरीवाल यांच्यासह संरक्षणमंत्री ए. के. अॅंटनी यांच्यावर हल्ला चढविला. ते म्हणाले, पाकिस्तानला तीन AK मुळे फायदा पोहचत आला आहे. पहिला आहे AK-47 ज्यामुळे देशाचे रक्षण करणा-या जवानांची मुंडकी उडविली जात आहेत. दुसरे आहे, संरक्षणमंत्री ए. के. अॅंटनी. यांच्या कमकुवत धोरणामुळे पाकिस्तान खुलेआम भारतावर हल्ले करीत आहे. तर तिसरे आहेत ज्यांनी नुकतीच पार्टी बनवलेले AK-49. या AK-49 यांच्या पक्षाच्या वेबसाईटवर काश्मीरला पाकिस्तानमध्ये दाखविले आहे. हाच AK- 49 हा पाकिस्तानचा एजंट म्हणून काम करीत आहे असे सांगत केजरीवाल यांचे नाव न घेता टीका केली. पाकिस्तान आता यांचाच फायदा घेत राजकारण करीत असल्याची मोदींनी सांगितले.
वैष्णवी देवींचे दर्शन घेऊन प्रारंभ- मोदींनी आज सकाळी वैष्णवी देवींचे दर्शन घेऊन भारत विजय रॅली अभियानाला सुरुवात केली. त्यानुसार पुढील काळात देशभर एकूण 185 प्रचारसभा घेणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात पुढील सहा दिवसात ते 23 सभा घेतील. आज त्यातील पहिली सभा जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील हिरानगर येथे घेण्यात आली. मोदींनी ऊधमपुर डोडा सीटवरील पक्षाचे उमेदवार डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासाठी ही सभा घेतली. त्यानंतर मोदी यूपीतील बुलंदशहरला रवाना झाले. तेथे ते डॉ. भोला सिंह यांच्यासाठी सभा घेतील. बुलंदशहरसह पश्चिम यूपीत दहा लोकसभा जागांसाठी 10 एप्रिलला मतदान होत आहे. नरेंद्र मोदी यांची तिसरी प्रचार सभा आज सायंकाळी उत्तर पूर्व दिल्लीतील शास्त्री पार्कमध्ये होणार आहे. दिल्लीतही 10 एप्रिलला मतदान होत आहे.