आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे मंत्रालय सांभाळण्यात अपयशी ठरूनही प्रभूंवर मोदींचा विश्वास कायम; वाणिज्य दिले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुधा शेवटच्या मोठ्या मंत्रिमंडळ बदलात आपल्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’वर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या टीमकडून आपली निवडणूक आश्वासने पूर्ण करण्याचा मोदींचा प्रयत्न असेल. २०१९ च्या निवडणुकीत ड्रीम प्रोजेक्ट निवडणुकीपुरतेच राहू नये हा हेतू. पुढील निवडणुकीत ही आश्वासने पूर्ण केल्याचा विश्वास त्यांना जनतेला द्यायचा आहे.

स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन आणि सर्वांना वीज देणे ही पंतप्रधानांची निवडणुकीतील तीन मोठी आश्वासने होती. स्मार्ट सिटी योजनेला गती देण्यासाठी त्यांनी आपल्या कोणत्याही नेत्यावर विश्वास न ठेवता माजी मुत्सद्दी हरदीप पुरींची निवड केली आहे. अमेरिका, जर्मनी आणि ब्राझीलमध्ये असताना नागरी विकास मुद्द्यांशी त्यांचा संबंध होता. त्यांचा हा अनुभव कामी येऊ शकतो. बुलेट ट्रेनही पंतप्रधानांचे मोठे स्वप्न आहे. त्यात जपानसोबत काम करायचे आहे. तेथे पीयुष गोयल यांना आणले आहे. ऊर्जा, कोळसा, खाणमंत्री म्हणून केलेले त्यांचे काम मोदींना आवडले आहे. त्यामुळे त्यांना रेल्वे देण्यात आले आहे.

सुरेश प्रभूंना रेल्वेतून हटवले असले तरी त्यांना त्याहून मोठे आणि महत्त्वाचे वाणिज्य मंत्रालय दिले आहे. त्यामुळे आश्चर्य वाटू शकते, पण पंतप्रधानांनी हे पाऊलही मेक इन इंडिया या आपल्या ड्रीम प्रोजेक्टला गती देण्यासाठी उचलले आहे. भलेही प्रभू रेल्वेतील अपघात रोखू शकले नाहीत, पण त्यांनी तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याच्या दिशेने रेल्वेची वाटचाल केली, त्यामुळे पंतप्रधान समाधानी होते. मेक इन इंडियाला प्रभू गती देऊ शकतील, अशी त्यांची अपेक्षा आहे.

- शपथविधी समारंभ ५ मिनीट उशिरा सुरू झाला. पाहुण्यांच्या खुर्चीत बसलेल्या पीयुष गोयल यांच्या मातोश्री बेशुद्ध झाल्या. दरबार हॉलमध्ये औषध दिले, नंतर त्यांना स्ट्रेचरवरून नेण्यात आले.
- अनंतकुमार हेगडे मुस्लिमविरोधी टिप्पणीसाठी चर्चेत होते. कर्नाटकच्या सिरसीत त्यांनी इस्लामला दहशतवादाचा टाइम बॉम्ब म्हटले होते. शपथविधीनंतर ते म्हणाले-मी जे म्हटले होते, त्याचा आजही अभिमान आहे.
- गजेंद्रसिंह शेखावत लोकप्रितेबाबतीत ओबामांच्या पुढे आहेत. प्रश्नोत्तराशी संबंधित कोरा या ब्लॉगिंग वेबसाइटवर शेखावत यांचे ५५,६०० फॉलोअर आहेत. ओबामा मागे.

मोदी मंत्रिमंडळात सत्तरीपार दोन मंत्री
कामगिरी :
देशाचे क्रीडा मंत्री पद पहिल्यांदाच ऑलिम्पिक मधील पदक विजेत्याकडे
२००४ मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत राज्य वर्धन सिंह राठोड यांनी रौप्य पदक मिळवले होते. आता ते देशाचे क्रीडा मंत्री झाले आहेत. त्यांनी  मंत्री विजय गोयल यांची जागा घेतली आहे. राठोड यांच्याकडे क्रीडा विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पदाची जबाबदारी असेल. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक संपादन करून क्रीडा मंत्री पदी विराजमान होणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत.

आश्चर्य : आर.के. सिंह यांनी पक्षावर तिकिट विकल्याचा आरोप केला होता, आता मंत्री
बिहारच्या आराचे खासदार आर.के. सिंह यांनी बिहार निवडणुकीदरम्यान पक्षावर तिकिट विक्रीचा आरोप केला होता. एवढेच नव्हे तर त्यावरून पक्ष आणि लालूंत फरक काय असेही ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांची वर्णी सर्वांसाठी धक्कादायक ठरली आहे.

७६ पैकी ७३ कॅबिनेट मंत्र्यांची एकूण संपत्ती ९५२ कोटी रुपये
- मोदी मंत्रिमंडळाच्या ९ पैकी ७ मंत्र्यांची एकूण संपत्ती ३६.६६ कोटी रुपये आहे. अर्थात ७ नवीन मंत्र्यांची सरासरी संपत्ती ५.१९ कोटी आहे.
- सर्वात श्रीमंत मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (१४ कोटी) आणि सर्वात कमी संपत्ती (८७ लाख) विरेंद्र कुमार यांच्याकडे आहे.
- गत मोदी मंत्रिमंडळाच्या ७८ मंत्र्यांपैकी एकूण संपत्ती सुमारे १००९ कोटी रुपये होती. तुलनेने फेरबदलात ५७ कोटींनी कमी झाली.
- फेरबदलानंतर आता ७६ पैकी ७३ कॅबिनेट मंत्र्यांची एकूण संपत्ती ९५२ कोटी आहे. }७३ पैकी ६८ मंत्री कोट्यधीश. दोघांचा डेटा उपलब्ध नाही. त्यावरून ९२ टक्के कोट्यधीश म्हणता येईल.

६६ वर्षीय मोदींच्या मंत्रिमंडळात पन्नासहून कमी वयाचे १२ मंत्री, सरासरी वय ५९.१९ वर्षे
मोदी सरकारच्या निम्म्याहून अधिक मंत्र्यांचे वय ६० किंवा त्यापेक्षा जास्त आहे. असे ४३ मंत्री आहेत. मोदींसह मंत्र्यांचे सरासरी वय ५९. १९ वर्षे आहे. दोघांचे वय ७० हून जास्त आहे.
- चौधरी विरेंद्र सिंह आणि राम विलास पासवान यांचे वय ७१ वर्षे आहे. ६५ किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे १७ मंत्री आहेत.
- ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे २४ मंत्री आहेत. ५० किंवा जास्त वयाचे २० मंत्री आहेत.
- पन्नासहून कमी वयाचे केवळ १२  तर अनुप्रिया पटेल  कमी वयाच्या ३६ वर्षेीय मंत्री ठरतात.
- नरेंद्र मोदींचे वय ६६ वर्षे आहे. त्याशिवाय मंत्रिमंडळात ६६ वर्षे वय असलेले आणखी सात मंत्री आहेत.

यूपीए Vs एनडीए: मनमोहन सरकारच्या तुलनेत मोदी मंत्रिमंडळ ६ वर्षांनी तरुण
वय : मंत्रिमंडळाचे वय ५९.१९ वर्षे
मोदी यांच्या ७६ सदस्यीय मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५९.१९ वर्षे आहे. यूपीए-२ च्या ७७ सदस्यीय मंत्रिमंडळाचे वय तेव्हा सरासरी ६५.३ वर्षे असे होते. अर्थात मोदी मंत्रिमंडळ गत कॅबिनेटच्या तुलनेत ६.११ वर्षांनी तरुण म्हटले पाहिजे.

संख्या : महिलांपैकी ६६ % कॅबिनेट मंत्री
७६ सदस्यीय मोदी मंत्रिमंडळात ९ महिला आहेत. अर्थात ११.८ टक्के महिला. नऊ महिलांपैकी सहा कॅबिनेट तर तीन राज्यमंत्री आहेत. अर्थात एकूण महिला मंत्र्यांपैकी ६६ टक्के कॅबिनेट मंत्री आहेत. यूपीए-२ सरकारमध्ये ७७ पैकी े ७ महिला होत्या. 
 
सोशल मीडिया
- मित्रांनो, चर्चेसाठी तुम्हाला गृहपाठ दिला आहे. तो करत राहा..तोपर्यंत मी चीनहून जाऊन येतो.
- खुंटी बदलल्याने म्हैस जास्त दूध देत नसते.
- निर्मलाजी जेएनयूच्या आहेत. मोदींना कोणीतरी याची आठवण करून दिली पाहिजे. जेएनयूचे विद्यार्थी तर देशद्रोही आहेत. बाकी जनता सगळे समजते.
- जनतेला सूचित करण्यात येते की,  आता रेल गाडी रुळावर घसरताच सुरेश प्रभू यांच्या ऐवजी पीयूष गोयल यांना ट्रोल करायचे आहे.
- बहुदा दहशतवादाचे उच्चाटन सीतेच्या हाताने होणार आहे. म्हणूनच संरक्षण मंत्री पदी सीतारमण आल्या आहेत.
- कॅबिनेट फेरबदल तर एक बहाणा आहे. फेकूला आपले अपयश लपवायचे आहे.
- विश्वास ठेवा..सीतारमण संरक्षण मंत्री होताच उत्तर कोरियात हायड्रोजन बाँबची चाचणी झाली.
बातम्या आणखी आहेत...