आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Modi Twit On Sonia Helth, But Congress Very Irrated

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनियांच्या प्रकृतीवर नरेंद्र मोदींचे ट्विट, मात्र काँग्रेस संतापली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी ट्विट करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर मंगळवारी काँग्रेसकडून पलटवार करण्यात आला. नेत्यांच्या प्रकृतीवरून राजकारण करणे टाळले पाहिजे. सुसंस्कृतपणा दाखवावा, असे काँग्रेसने मोदींना सुनावले आहे.


नरेंद्र मोदींनी मंगळवारी सकाळी ट्विटमध्ये सोनियांवर केलेल्या टिप्पणीमुळे काँग्रेस पक्षातील नेते भडकले. माणूस म्हटल्यानंतर कोणीही आजारी पडू शकतो. त्याच्याबाबतीत असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. परंतु ज्या प्रकारे ट्विट करण्यात आले आहे. ते अयोग्य आहे. एका सुसंस्कृत समाजात अशा गोष्टींना स्थान नाही. नेत्यांनी इतर नेत्यांच्या प्रकृतीवरून राजकारण करू नये, असे काँग्रेसचे प्रवक्ते भक्तचरण दास यांनी म्हटले आहे. सोनियांना त्रास होऊ लागला. त्यावेळी तेथे डॉक्टर व सर्व साधने उपलब्ध होती, परंतु तरीही त्या क्षणी सभागृहातून अचानक बाहेर पडल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत कोण होते किंवा काय साधने होती, या गोष्टी खासगी आहेत. या गोष्टी वादविवाद करण्याच्या आहेत का, असा सवाल दास यांनी उपस्थित केला. अशा प्रकारचा प्रश्न एखादा माणूस उपस्थित करेल, असे मला वाटत नाही. त्या अगोदर संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी मोदी यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली होती. मोदी त्यावरून राजकारण करत आहेत का, अशा शब्दांत त्यांनी मोदींना फटकारले. दरम्यान, सोनियांना मंगळवारी एआयआयएमएस रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.


मोदींचे ट्विट
सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची काळजी वाटते. त्यांच्यासाठी आणीबाणीच्या काळातील पायाभूत वैद्यकीय प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात आली नाही. खरे तर त्यांना अस्वस्थ वाटू लागले तेव्हाच संसदेत व्हिल चेअर उपलब्ध करून द्यायला हवी होती. म्हणून चिंता वाटते. त्यांना किमान सर्व सुविधा असलेल्या अ‍ॅम्बुलन्समध्ये तरी न्यायला हवे.