आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींना पंतप्रधानपदाची नशा : सचिन पायलट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रत्येक ठिकाणी आवेशपूर्ण भाषण करणा-या मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फटकारतानाच मोदींना महत्त्वाकांक्षेने झपाटले आहे. त्यांना पंतप्रधानपदाची नशा चढली आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी केली.
पंतप्रधान होण्याच्या इच्छेने झपाटलेल्या मोदी यांना योग्य-अयोग्यतेचेदेखील भान राहिलेले नाही. समाजात फूट पाडून हिंदुत्वाचा अजेंडा पुढे करणे हाच त्यांचा या धडपडीमागील उद्देश असल्याचा आरोपही पायलट यांनी केला. परंतु भारतातील जनता या सर्व गोष्टींच्या आता खूप पुढे गेली आहे.

तरुणांचा मोठा समुदाय देशात आहे. त्यामुळे भारताने एक प्रकारे कात टाकली आहे. मध्यमवर्गीयांना मंदिर किंवा मशिदीपेक्षा महाविद्यालये अधिक हवी आहेत. मोदी नशेत असल्यामुळे त्यांना योग्य काय, अयोग्य काय, हेच कळेनासे झाले आहे. पंतप्रधानांचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण कोणत्याही एका पक्षासाठी नसते. देशाचे नेते म्हणून बोलत होते. परंतु त्या दिवशीदेखील मोदी यांना राजकारण करावे वाटले. त्यांनी केलेल्या टीकेची वेळ दुर्दैवी होती, असे पायलट म्हणाले.