आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Wants His Minister To Work For 18 Hours Per Day!

जाणून घ्या, कशा खासदारांना मंत्री करणार मोदी, कसा ठरणार मंत्र्यांच्या कोट्याचा फॉर्मूला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी 26 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधानपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतील. त्यांच्यासोबत काही कॅबिनेट मंत्री देखील शपथ घेतील. मात्र, अद्याप हे स्पष्ट झालेले नाही, की मोदींसोबत कोण-कोण शपथ घेणार आहे. दिल्लीतील गुजरात भवन सध्या भाजपच्या राजकारणचे केंद्र बनले आहे. गुरुवारपासून मोदी गुजरात भवनमध्येच मुक्कामाला आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मोदींच्या कॅबिनेटसाठी खासदारांचे बायोडेटा तपासले जात आहे. मोदी स्वतः या प्रक्रियेत सहभागी आहेत. शुक्रवारी सर्वप्रथम भाजपच्या त्या खासदारांचे बायोडेटा पाहिले गेले, जे प्रथमच संसदेत आले आहेत. असे, बोलले जात आहे की मोदींची इच्छा आहे, त्यांच्या मंत्र्यांनी दिवसातील रोज 18 तास काम करावे.
कसे असेल मोदींचे मंत्रिमंडळ?
मोदींची इच्छा आहे, की त्यांच्या कॅबिनेटची संख्या कमी आणि राज्यमंत्र्यांची फौज जरा जास्त असावी. सुत्रांच्या माहितीनुसार, मोदी 20:30 च्या सुत्रानुसार मंत्रिमंडळ स्थापन करु इच्छितात. याचा अर्थ 20 कॅबिनेट मंत्री आणि 30 राज्यमंत्री. यात एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला एका मोठ्या मंत्रालयाची जबाबदारी दिली जाईल आणि ज्युनिअर मंत्री त्यांना रिपोर्ट करतील आणि त्यानंतर निर्णय होईल. मोदींचे म्हणणे आहे, की यामुळे सरकारच्या निर्णयावर याचा परिणाम होईल आणि सरकारी खर्च देखील कमी होईल.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय आहे मोदींच्या कॅबिनेटची अट