आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Wants Parliamentary Board's Stamp On His Plan

'काँग्रेस सोडले पण, मुलायम सिंह यांच्या विरोधात बोलणे सोडणार नाही'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उठ-सूठ मुलायम सिंह यादव यांच्यावर टीकेची झोड उठवणारे केंद्रीय स्टील मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी धमकी दिली आहे की, मुलायसिंह यांच्या विरोधात बोलण्यापासून त्यांना कोणी रोखले तर ते काँग्रेस सोडून देतील. काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांच्या नेत्यांना बोलताना संयम पाळण्याचा नुकताच सल्ला दिला आहे. अशा वेळेस वर्मा यांचे हे वक्तव्य नेत्यांनाच आव्हान ठरत आहे.

वर्मा यांनी मंगळवारी, मुलायम सिंह यादव यांना देशाचे पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे. मात्र, पंतप्रधानांकडे झाडू मारण्याची नोकरी करण्याचीही त्यांची लायकी नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधनानंतर काँग्रेसने बुधवारी त्यांना फटकारले. त्यांनी अशी वक्तव्ये करू नये, असा इशारा काँग्रेसने दिला. काँग्रेसचे सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री यांनी वर्मा यांना बुधवारी आपल्या निवासस्थानी बोलावले होते. वर्मा यांनी आपल्या वक्तव्याबद्दल मिस्त्री यांच्याकडे खेद व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. मात्र, दुस-याच दिवशी वर्मा मुळरुपात परतले आहेत. मुलायम सिंह यांच्या विरोधात बोलणे सोडणार नसल्याचेच त्यांनी स्पष्ट केले आहे.