आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Was Denied But Rahul Got Permission To Land Helicoptor

मोदींना नाकारली पण राहुल गांधींना मिळाली परवानगी, केंद्राची दुटप्‍पी भूमिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- नैसर्गिक संकटानंतर आता उत्तराखंडचे सरकार आणि कॉंग्रेसवर दुहेरी टीका सुरु झाली आहे. बचाव कार्यात तत्‍परता न दाखविल्‍यावरुन उत्तराखंड सरकारविरुद्ध स्‍थानिकांमध्‍ये तीव्र नाराजी आहे. तर व्‍हीव्‍हीआयपी दौ-यावरुन दुहेरी मापदंड लावल्‍याची टीका होत आहे. बचाव कार्यात अडथळा निर्माण होण्‍याचे कारण पुढे करुन नरेंद्र मोदींना हेलिकॉप्‍टर उतरविण्‍यास केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी परवानगी नाकारली होती. तर या नैसर्गिक संकटात 7 दिवसांनी अवतरलेले कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांना मात्र परवानगी देण्‍यात आली. राहुल गांधींचे हेलिकॉप्‍टर उतरविण्‍यास परवनगी देण्‍यात आलीच, शिवाय गोचर येथे आयटीबीटीच्‍या शिबिरात त्‍यांनी रात्रही काढली. या भेदभावामुळे अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत.

सुशीलकुमार शिंदे यांनी मोदींना परवानगी नाकारताना म्‍हटले होते की, आम्‍ही सर्व व्‍हीआयपींना उत्तराखंडचा दौरा न करण्‍याची विनंती करतो. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. त्‍यामुळे व्‍हीआयपींच्‍या दौ-यामुळे याकामात अडथळा निर्माण होईल. तरीही कोणी व्‍हीआयपी गेल्‍यास त्‍यांचे हेलिकॉप्‍टर लँड करण्‍याची परवानगी देण्‍यात येणार नाही.

शिंदेच्‍या वक्तव्‍यानंतर मोदींनी उत्तराखंडमध्‍ये हवाई पाहणी टाळली. परंतु, त्‍यांनी तिथे जाऊन गुजरातच्‍या यात्रेकरुंना परन नेले होते. त्‍यांनी एक समांतर मोहित राबवून हे काम फत्ते केले होते. तर आता राहुल गांधींच्‍या दौ-यावरुन प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे. व्‍हीआयपींना परवानगी नाही तर मग राहुल गांधींना कसे काय जाऊ दिले, जर जाऊ दिले तर मग राहुल गांधी व्‍हीआयपी नाही का आणि राहुल गांधींच्‍या दौ-यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला नाही का, असे प्रश्‍न भाजपच्‍या नेत्‍यांनी उपस्थित केले आहेत.

राहुल गांधी सोमवारी सायंकाळी डेहराडूनमध्‍ये पोहोचले होते. तर मंगळवारी ते गुप्‍तकाशीत दाखल झाले. या दौ-यावर झालेल्‍या टीकेला उत्तर देताना राहुल गांधींनी सांगितले की, आधी आलो असतो तर बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला असता.