आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरात नरेंद्र मोदींची लाटः लालुंकडून गुणगान, राजकीय चर्चेला उधाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- देशात सध्‍या भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदींची लाट आली असल्‍याचे राष्‍ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी मान्‍य केले आहे. परंतु, हे मान्‍य करतानाच त्‍यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांना याबाबत सावध राहावे, असा इशाराही दिला आहे. नरेंद्र मोदी यांना बिहारच्‍या नालंदा मतदारसंघातून निवडणूक लढविण्‍याचे आवाहन राज्‍यातील भाजप नेत्‍यांनी केले आहे.

लालू प्रसाद यादव यांच्‍या या वक्तव्‍यावरुन राजकीय चर्चेला उधाण आले आहे. हे वक्तव्‍य म्‍हणजे लालू प्रसाद यादव यांचा मोदींकडे झुकता कल असल्‍याची टीका बिहारचे मुख्‍यमंत्री नितीशकुमार यांचे सहकारी संजय झा यांनी केली आहे. मोदींना पाठींबा देण्‍याचे निर्देश लालुंचे राजकीय गुरु पगला बाबा यांनी दिले असून त्‍याचेच हे संकेत असल्‍याचे झा म्‍हणाले.

दुसरीकडे जेडीयुचे नेते शिवानद तिवारी यांनीही मोदींच्‍या लोकप्रियतेवर शिक्‍कामोर्तब केले आहे. ते म्‍हणाले, मोदींच्‍या लोकप्रियतेवर कोणताही संशय नाही.