आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Will Address A Rallly In Punjab, Rahul In Dehradoon

राजकारणात राग - द्वेष - गर्वाला स्थान नाही, राहुल गांधींचा नाव न घेता मोदींवर हल्लाबोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देहरादून येथील परेड ग्राउंडवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी यांनी रॅलीला संबोधीत करताना भाजपवर जोरदार हल्ला बोल केला.
लोकांचे दुःख कमी करायचे असेल तर, प्रथम स्वतःमधील घमेंडखोर वृत्ती कमी करायला पाहिजे असे सांगत त्यांनी मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर शरसंधान साधले. ते म्हणाले, राजकारणात राग, द्वेष आणि गर्वाला स्थान नाही. कारण जर आमच्यात घमेंडखोर वृत्ती असेल तर, कोणाचेच म्हणणे आम्हाला समजणार नाही.
उत्तराखंडमध्ये झालेल्या महाप्रलायची आठवण करुन देत ते म्हणाले, जूनमध्ये येथे फार मोठे संकट आले होते. तेव्हा जगाने उत्तराखंडची शक्ती काय आहे ते पाहिले आहे. उत्तराखंडच्या मदतीचा गाजावाजा करणारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले, येथे महाप्रलय झाला त्यानंतर मी येथे शांतते आलो, आपल्यात मिसळलो. तुमचे दुःख जाणून घेतले.
ते म्हणाले, उत्तराखंडमध्ये सर्वाधिक मदतकार्य हे लष्कराच्या जवानांमुळे शक्य झाले. त्यांनी सर्वस्व अर्पण करुन देशाची सेवा केली. सैनिकांची वन रँक वन पेंशन योजना पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांनी मान्य केली आहे.
स्वस्त सिलिंडरची संख्या वाढवून काँग्रेसने महिलांची मदत केली आहे. पक्षात देखील महिलांना मानेचे स्थान दिले जाणार आहे. महिलांच्या सबलीकरणाशिवाय देश सुपरपॉवर होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या क्षमतांना वाव देणे गरजेचे आहे, असे सांगत त्यांनी भाजपकडे मोर्चा वळविला. ते म्हणाले, त्यांच्याकडे (भाजप) दृष्टीकोणाचाच आभाव दिसत आहे. पुढे काय करायचे याचे व्हिजनच त्यांच्याजवळ नाही.