आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन म्हणतात, \'पंतप्रधानपदी मोदी नको\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान होण्याला कडवा विरोध दर्शवला आहे. सेन म्हणाले, मोदींचे मॉडेल या देशाचा राज्यकारभार पाहाण्यासाठी योग्य नाही.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सेन यांनी, मला मोदी पंतप्रधानपदी नको असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, एक भारतीय नागरिक म्हणून देशाच्या पंतप्रधानपदी मोदी मला नको आहेत. त्यांनी अल्पसंख्याकांना सुरक्षीत वाटेल असे शासन दिलेले नाही. त्याचबरोबर भौतिक विकासाची चर्चा करताना त्यांनी आरोग्य आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष्य केलेले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, एनएसएसओने फोडला मोदींच्या विकासाचा फुगा; गुजरातपेक्षा महाराष्ट्र पुढे