आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या नावाची लवकरच घोषणा होणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात यासंदर्भात घोषणा करण्यात येईल. या घोषणेनंतर मोदी विरुद्ध राहुल गांधी असा थेट राजकीय लढा सुरु होईल.
भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. गेल्या 4 दिवसांमध्ये ही दुसरी बैठक होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदीय मंडळाकडून मोदींबाबत औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींच्याच नावाला पसंती दिली आहे. यासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना स्पष्ट भूमिका कळविण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी अडवाणी, जोशी आणि भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सरसंघचालकांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. त्याचवेळी याबाबत संघाने भूमिका स्पष्ट केली, असे सुत्रांचे म्हणणे आहे.
आरएसएसचे आजपासून अमरावतीमध्ये तीन दिवसीय शिबिर सुरु होणार आहे. त्यात मोदींच्याच उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.