आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत नवरात्रीचे उपवास करणार मोदी, फक्त व्हिटामीन वॉटर, लिंबू पाणी सेवन करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : जापानच्या दौ-यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोबत जपानचे पंतप्रधान शिंजो आबे

नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौ-याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. व्हाइट हाऊसमध्ये त्यांच्या स्वागतावेळी आयोजित केल्या जाणा-या डिनरसाठी विविध पदार्थांची लांबलचक यादी तयार करण्यात आली आहे. पण नरेंद्र मोदींना ओबामांच्या या मेजवानीचा आस्वाद घेता येणार नाही. त्याचे कारण म्हणजे अमेरिका दौ-यादरम्यान नरेंद्र मोदींचा नवरात्रीचा उपवास असेल.
एका इंग्रजी वृत्तपत्राने पीएमओमधील अधिका-यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मोदी नवरात्रात (25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर) केवळ द्रव पदार्थांचेच सेवन करतील. पीएमओच्या अधिका-याने सांगितले की, 'मोदी गेल्या 40 वर्षांपासून नवरात्रीचा उपवास करतात. त्याप्रमाणे ते यावर्षीही हा उपवास करणार आहेत. अमेरिकेत या भेटीदरम्यान ते फक्त लिंबू पाणी किंवा व्हिटामीन वॉटर याचेच सेवन करतील. मात्र याबाबत त्यांनी अद्याप काही निर्देश दिलेले नाहीत.'
दरम्यान, न्‍यूयॉर्क मेडिसन स्‍क्वेअरमध्ये मोदींच्या कार्यक्रमाच्या तयारीत गुंतलेले एनआरआयही मोदींच्या उपवासाचा विचार करून कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. मोदींच्या उपवासाचा काळ असल्याने त्यांच्यासाठी फार जास्त कार्यक्रमांचे आयोजन केले जात नसल्याचे या अनिवासी भारतीयांचे म्हणणे आहे. कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे डॉ. बराई यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या उपवासाबाबत माहिती असल्याने त्यांना दौ-यात जास्त थकवा येऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे. मोदींच्या दौ-याबाबत लोक एवढे उत्साही आहेत की, अनेक शहरांमधून कार्यक्रमांसाठी निमंत्रण मिळत आहे. पण ती सर्व स्वीकारणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.